Milk : ऐन सणासुदीत दूध दरात घसरण; शेतकऱ्यांना आर्थिक फटका

0
190

नगर : यंदा पावसाने दडी मारल्याने नगर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम हा जसा शेतीवर झालाय तसाच दुग्धव्यवसायावर देखील झालाय. अनेक भागात चारा टंचाईला सुरुवात झाली आहे. शेतीला जोडधंदा असणाऱ्या दूध (Milk) व्यवसायावर परिणाम झाला आहे. दूध दरात (Milk rate) मोठी घसरण झाली आहे. ३४ रुपयापर्यंत गेलेले दर आता २८ रुपयावर आले आहेत. तर दुसरीकडे चाऱ्याचे व पशुखाद्याचे (animal feed) भाव गगनाला भिडलेले आहेत. दुधाळ जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना आता अवघड जात आहे.

हे देखील वाचा : राम शिंदेंनी ‘राष्ट्रवादी’ला पाडले खिंडार; शेकडो समर्थकांसह ‘या’ युवा नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

पावसाने हात आखडता घेतल्याने जनावरांचा चारा खराब झाला. यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. एकूणच काय तर कर्ज काढून जनावरे खरेदी केली, मात्र चारा प्रश्नामुळे गावातील शेतकऱ्यांचा आणि दुग्ध व्यवसायिकांचं आर्थिक गणित पुरतं कोलमडलं आहे. ज्याचा परिणाम इतरही व्यवसायांवरती झाल्याचं ग्रामस्थ सांगतात.

नक्की वाचा : राज्यात पुढील २४ तासाचा पावसाची शक्यता

गेल्या तीन महिन्यात दूध दर प्रति लीटर पाच रुपयेने घसरले आहेत. दिवाळीला दूध दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांची दिवाळी कडू होण्याची शक्यता आहे. सरकारी अध्यादेशाला दूध संघांनी केराची टोपलीत टाकून मनमानी कारभार चालू केला आहे. टप्प्याटप्प्याने दूध दरात मोठी घसरण होत चालली आहे. मे जून महिन्यात गायींच्या दूध दरात ३८ रुपयांचा उच्चांक नोंदवला होता. शासनाने अध्यादेश काढून कमीतकमी ३४ रुपये दरापेक्षा कमी दर देऊ नये, असे स्पष्ट केले होते. परंतु आता अध्यादेश काढल्यापासून दूध घरात घट होत आहे. जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर या तीन महिन्यात पाच रुपयांनी दूध दर कमी झाले. तर दिवाळी सणाच्या तोंडावरच मोठी घसरण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारचे नियंत्रण नसल्यानेमुळे दूध संघांची मनमानी चालू आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आथिर्क फटका सहन करावा लागत आहे. नगर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात चारा नेण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. तरी देखील येऊ घातलेल्या दुष्काळाची चाहूल लक्षात घेता शासन प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून चाऱ्याचं नियोजन सरकारने करणे गरजेचे असल्याचं आदर्श गाव हिवरे बाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी म्हटलं आहे.