Mansi Naik New Song : मानसी नाईकची ‘लावा फोन चार्जिंगला’ लावणी  प्रेक्षकांच्या भेटीला

'लावा फोन चार्जिंग'ला या फक्क्ड लावणीला नवोदित गायिका प्रियंका चौधरीचा जबरदस्त आवाज लाभला आहे.

0
191

नगर : एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘गणराया’ आणि ‘करा ऊस मोठा’ या दोन गाण्यांनंतर आता ‘लावा फोन चार्जिंगला’ (Lava Phone Chargingla) ही ठसकेबाज लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सर्वांनाच ठेका धरायला लावणाऱ्या ‘लावण्यवती’ च्या गाण्यांमध्ये ‘लावा फ़ोन चार्जिंगला’ या अजून एक ठसकेदार लावणीचा समावेश झाला आहे. नुकताच या लावणीचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

नक्की पहा :  राज्यात पुढील २४ तासाचा पावसाची शक्यता 

‘लावा फोन चार्जिंग’ला या फक्क्ड लावणीला नवोदित गायिका प्रियंका चौधरीचा जबरदस्त आवाज लाभला आहे. महाराष्ट्राची लाडकी नर्तिका मानसी नाईकच्या (Mansi Naik) नखरेल अदाकारीने या लावणीला चारचांद लावले आहेत. या गाण्याचे दिग्दर्शन व नृत्य दिग्दर्शन ‘सुंदरीकार’ आशिष पाटील यांचे असून ‘रॉकस्टार’ अवधूत गुप्तेंचे शब्द आणि स्वररचना आहे. या सर्वांच्या कलेने ही ‘लावण्यवती’ बहरली आहे.

हेही पहा :  “कर्ज पुनर्गठन नको, तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा”

‘लावण्यवती’ अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, ‘लावण्यवती’तील पहिल्या दोन लावण्या संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरल्या. आता ही तिसरी बहारदार लावणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मानसी नाईकने आपल्या नजाकतीने तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. आता या लावणीने तिच्या चाहत्यांमध्ये अधिकच भर पडणार आहे. खूप धमाकेदार अशी ही लावणी आहे.’