Unseasonal Rain : राज्यात पुढील २४ तासात पावसाची शक्यता 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.

0
212

नगर : मागील काही दिवसांपासून राज्यात कुठे पाऊस (Rain) तर कुठे ऊन असं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता (Chance of rain) हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

नक्की पहा : राम शिंदेंनी ‘राष्ट्रवादी’ला पाडले खिंडार; शेकडो समर्थकांसह ‘या’ युवा नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यासह देशात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. राज्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली असून नोव्हेंबरच्या शेवटी थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

अवश्य वाचा :  “कर्ज पुनर्गठन नको, तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा”

आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मुंबईसह, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी रविवारी (ता. १२) तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. दुपारी मात्र उन्हाचा चटका बसत होता. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशातील काही भागात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.