Milk Price News: नगर : दूध उत्पादक (Milk producer) शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण दुधाला अनुदान (Milk Subsidy) देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता दुधासाठी सरकार ५ रुपयांचं अनुदान (Grant) देणार आहे. त्यामुळं पाच रुपयांच्या सबसिडी सह दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३२ रुपयांचा दर मिळणार आहे. ३२ रुपयांचा दर ठरल्यास दूध संघांना शेतकऱ्यांना २७ रुपये प्रति लिटर दर द्यावा लागेल.
नक्की वाचा : ‘मी स्वतः त्यांचा वध करणार’; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर परमहंस आचार्य महाराजांचा संताप अनावर
राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकाला प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले होते. मात्र, घोषणेनंतर याबाबतचा कोणताही आदेश निघाला नव्हता. दरम्यान,आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अवश्य वाचा : विद्यार्थ्यांकडून रस्ते अपघात व सुरक्षा आपत्तीचे ‘माॅक ड्रिल’
राज्यातील ७२ टक्के दूध खासगी संस्थांना दिले जाते आणि सरकारनं दिलेलं अनुदान फक्त सहकारला आहे. त्यामुळं बहुतांश दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार आहेत. त्यामुळं सरकारनं सर्वांना अनुदान द्यावं, अशी मागणी किसान सभेनं केली होती. याचाच विचार करत आज हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे अनुदान मिळवण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. ही योजना दिनांक १ जानेवारी ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी लागु राहणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेवून मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.