Milk price : प्रांत कार्यालयासमोर दूध ओतून आंदोलन

0
Milk price : प्रांत कार्यालयासमोर दूध ओतून आंदोलन
Milk price : प्रांत कार्यालयासमोर दूध ओतून आंदोलन

Milk price : संगमनेर : दुधाला किमान ३४ रुपये दर द्यावा, या मागणीसाठी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी (Dairy farmers) संघर्ष समितीने संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून आंदोलन केले. राज्यभर दुधाचे भाव (Milk price) कोसळल्यामुळे व पशुखाद्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना अशा अडचणीच्या काळात मदत व्हावी, यासाठी सरकारने (Govt) हस्तक्षेप करावा, ही रास्त अपेक्षा बाळगून शेतकऱ्यांनी राज्यभर तीव्र आंदोलने केली. आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने दुधाला किमान ३४  रुपये भाव द्यावा, असा शासनादेश (Government order) काढला. मात्र, सरकारचा हा शासनादेश खासगी व सहकारी दूध संघांनी धुडकावून लावला आहे. सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने कारवाई करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

हे देखील वाचा : काँग्रेस आमदारांचा माेठा गट भाजपात जाणार?; तीन राज्यातील निकालानंतर चर्चांना उधाण


दुधाला किमान ३४ रुपये दर द्यावा, पशुखाद्याचे भाव कमी करावे, मिल्को मिटर व वजन काट्यांची नियमित तपासणी करावी व दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक यावेळी आंदोलनात मोठ्या सहभागी झाले होते. संगमनेर येथील धनगर गल्ली याठिकाणी असलेल्या किसान सभेच्या कार्यालयात सुरूवातीला शेतकरी जमा झाले. संगमनेर शहरातून मोर्चा काढत शेतकऱ्यांनी सकाळी ११.३० वाजता प्रांताधिकारी कार्यालयाकडे कूच केले. सरकारचा आणि दूध कंपन्यांचा निषेध करणाऱ्या घोषणा देत हा मोर्चा शहराच्या मुख्य रस्त्यावरून प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचला. प्रांत कार्यालयाच्या दारात दूध ओतून यावेळी आंदोलन करण्यात आले.

नक्की वाचा : अखेर भिडेवाडा झाला इतिहासजमा ;महापालिकेकडून कारवाई

३० नोव्हेंबर रोजी अकोले तहसील कार्यालयात दूध ओतले. आज संगमनेर प्रांत कार्यालयात दूध ओतून आंदोलन करण्यात आले. सरकारने तरीही दाद दिली नाही तर मंत्रालयात दूध ओतावे लागेल, असा इशारा यावेळी किसान सभेचे राज्य सहसचिव सदाशिव साबळे यांनी दिला. मोर्चामध्ये दूध उत्पादकांच्या सोबतच बांधकाम कामगार व वन जमीन धारकही मोठ्या संख्येने सामील झाले होते. त्यांच्याही मागण्यांचे निवेदन यावेळी प्रांताधिकारी संगमनेर यांना देण्यात आले. या आंदोलनात डॉ. अजित नवले, सतीश देशमुख, सदाशिव साबळे, जोतीराम जाधव, महेश नवले, डॉ. मनोज मोरे, नामदेव भांगरे, डॉ. संदीप कडलग, एकनाथ मेंगाळ, रामनाथ वादक, नंदू रोकडे, नंदू गवांदे, ताराचंद विघे, संगीता साळवे आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here