जिल्हा बँकेत नगर तालुक्याचा हक्काचा उमेदवार असणे गरजेचे
MLA Akshay Kardile : अहिल्यानगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी सातत्याने प्रयत्न केले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना न्याय देण्याला त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नगर तालुक्याचा हक्काचा उमेदवार बँकेत असणे अत्यंत गरजेचे आहे, असे आमदार अक्षय कर्डिले (MLA Akshay Kardile) यांनी सांगितले.
बँकेच्या ठरावातील मतदारांची बैठक आयोजित
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील पदाधिकारी, नगरसेवक तसेच बँकेच्या ठरावातील मतदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नगर तालुक्यातील १०७ पैकी १०२ ठरावातील मतदार उपस्थित होते. त्यामुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींची निवडणुकीबाबतची भूमिका आणि सहभाग याकडे लक्ष लागले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आमदार अक्षय कर्डिले म्हणाले, (MLA Akshay Kardile)
जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू बँक आहे. शेतकऱ्यांच्या कर्जापासून विविध सहकारी संस्थांच्या प्रश्नांपर्यंत अनेक बाबी जिल्हा बँकेशी संबंधित आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडायचे असतील, तर नगर तालुक्याचा स्वतःचा हक्काचा प्रतिनिधी जिल्हा बँकेत असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व कारखानदार आणि सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींचे लक्ष सध्या नगर तालुक्यातील मतदारांकडे लागले आहे. तालुक्याचा उमेदवार बँकेत गेल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या संचालकपदाची तीन वेळा, तर अध्यक्षपदाची दोन वेळा जबाबदारी सांभाळली. अध्यक्षपदावर असताना त्यांनी शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या प्रश्नांना प्राधान्य देत निर्णय घेतले. प्रत्येक सोसायटीच्या सभासदांना त्यांच्या हक्काचे स्थान आणि न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केले, असेही अक्षय कर्डिले यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळते. त्यामुळे बँकेतील निर्णय प्रक्रियेत ग्रामीण भागाचा प्रभावी आवाज असणे महत्त्वाचे आहे. नगर तालुक्यातील शेतकरी, विविध सेवा सोसायट्या आणि सहकार क्षेत्राशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्याचे प्रतिनिधित्व आवश्यक असल्याचे यावेळी बैठकीत नमूद करण्यात आले.
आगामी जिल्हा बँक निवडणुकीत नगर तालुक्याची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, तालुक्यातील ठरावातील मतदारांची भूमिका आणि निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यावेळी मकृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर, भाऊसाहेब बोठे,रभाजी सुळ, संभाजी लोंढे, भाऊसाहेब काळे, विष्णु खांदवे, अशोक झरेकर, भाजप तालुकाध्थ दिपक कार्ले, मंजाबापु घोरपडे, सुभाष निमसे, रामदास सोनवणे, पोपट ढगे सह बाजार समिती संचालक ग्रामस्थ उपस्थित होते.



