Murder : वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या

Murder : वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या

0
Murder
Murder

Murder : राहुरी : राहुरी येथील न्यायालयात वकिली काम करणाऱ्या आढाव दाम्पत्याचे अपहरण (Abduction) करून त्या दाम्पत्याचा निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना घडली. राहुरी तालुक्यातील उंबरे या गावातील अमरधाम नजीकच्या बारवेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तीन संशयितांना राहुरी पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. दोन संशयित आरोपी पसार असल्याचे समजते.

नक्की वाचा : अध्यादेशाला धाेका झाल्यास आझाद मैदानावर आलाेच म्हणून समजा; मनाेज जरांगेचा इशारा

आढाव दाम्पत्याचा दिवसभर शोध (Murder)

राहुरी न्यायालयात वकील करणारे दाम्पत्य ॲड. राजाराम आढाव व मनीषा राजाराम आढाव हे गुरुवारी राहुरी न्यायालयातून नगर न्यायालयात कामकाज पाहण्यासाठी जातो असे सांगून गेल्यानंतर ते पुन्हा कोणाला दिसले नाहीत. रात्री पोलीसग्रस्त घालत असताना राहुरी न्यायालयात परिसरात एक वाहना जवळ काही अज्ञात व्यक्ती दिसले. पोलिसांची चाहूल लागताच ते व्यक्ती एका वाहनामधून मल्हारवाडी रस्त्याच्या दिशेने पसार झाले होते. आढाव दाम्पत्याचा दिवसभर शोध चालू होता.

हे देखील वाचा: नरभक्षक बिबट्याच्या हल्लात चिमुकला ठार

बारवेत आढळून आले मृतदेह (Murder)

Murder
Murder

एलसीबी व स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला होता. काल (शुक्रवारी) रात्री त्याचे मृतदेह उंबरे येथील अमरधाम जवळील बारवेत आढळून आले. हे मृतदेह दगडांनी बांधलेले होते. आढाव दाम्पत्याची हत्या नेमके कशातून झाली हे समजले नसले तरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा सुगावा लावल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here