Manoj Jarange Patil : अध्यादेशाला धाेका झाल्यास आझाद मैदानावर आलाेच म्हणून समजा; मनाेज जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange Patil :'मराठा समाजातील ज्याची कुणबी नोंद मिळाली आहे. त्यांच शपथपत्र घेऊन सोऱ्यांना देण्यात याव. गृहचौकशी नंतर करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

0
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : नगर : मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदाेलनाला अखेर यश मिळालं आहे. मराठा समाजातील ज्याची कुणबी नोंद मिळाली, त्याच्या गणगोतातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) देण्यात येणार आहे. आम्ही हा अध्यादेश (Ordinance) निघाल्यामुळे हा गुलाल उधळला आहे. फक्त त्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. जीआर कायम राहिला पाहिजे. अध्यादेशाला धाेका झाल्यास आझाद मैदानावर आलाेच म्हणून समजा, असा इशारा मनाेज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Manaj Jarange Patil

राज्यभरात जल्लाेष

हे देखील वाचा : नगर-कल्याण रस्त्यावर भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

मनोज जरांगे पाटील म्हणाले, ”मराठा समाजातील ज्याची कुणबी नोंद मिळाली आहे. त्यांच शपथपत्र घेऊन सोयऱ्यांना देण्यात यावं. गृहचौकशी नंतर करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाकडून राज्यभरात जल्लोष केला जात आहे.  मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू हाेता. ज्या ५४ लाख नाेंदी सापडल्या. त्या वाटप करण्यात येत आहे. त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र द्यावे, साडेचार महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. आरक्षणासाठी ३०० पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या.

शिंदे समितीला मुदतवाढ (Manoj Jarange Patil)

Manaj Jarange Patil

ज्यांची नाेंद मिळाली, त्याच्या सगेसाेयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. जाे सग्यासाेयऱ्यांचा अध्यादेश निघाला आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठी शिबिर सुरू आहे. शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ द्यावी. मराठवाड्या १८८४ चं गॅझेटही शिंदे समितीकडे देऊन लागू करावं. मराठा ओबीसी एकजूट कायम राहील, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil

अवश्य वाचा : रामदास आठवलेंचा नगर दाैऱ्याआधी आरपीआय गटात घमासान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here