Murder : ठाकरे गटातील माजी नगरसेवकाची हत्या

Murder : ठाकरे गटातील माजी नगरसेवकाची हत्या

0
Murder

Murder : नगर : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर दहीसर येथे गोळीबार करून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. उल्हासनगर येथील गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) गोळीबार प्रकरण शांत होत नाही तोवर ही घटना घडल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून (Law and order) पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पूत्र आहेत.

नक्की वाचा: एकनाथ शिंदे सरकारी पैशाने गुंडांना पोसतात : संजय राऊत

मात्र त्याआधीच त्यांची हत्या (Murder)

अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या घातल्यानंतर मॉरिस त्याच्या कार्यालयाबाहेर आला. त्यानंतर हातातली रिव्हॉल्वर उंचावर आय किल्ड अभिषेक, वो कल मनाली नही जायेगा असं ओरडला. अभिषेक यांच्या लग्नाचा वाढदिवस १४ फेब्रुवारी रोजी होता. लग्नाचा वाढदिवस मनालीला साजरा करण्याचं नियोजन त्यांचं होतं. मात्र, त्याआधीच त्यांची हत्या करण्यात आली.

हे देखील वाचा: ‘लाेकसभे’ला लाेकांची पसंती कुणाला; सर्व्हेची धक्कादायक आकडेवारी समाेर

त्याबाबत खळबळजनक माहिती (Murder)

मॉरिस नरोना याने गुन्ह्यामध्ये जे शस्त्र वापरलं आहे, त्याबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मॉरिस भाईने गोळीबारात जे शस्त्र वापरलं आहे, ते अवैध शस्त्र असल्याचा संशय आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून मॉरिसला शस्त्र परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे मॉरिसने ज्या पिस्तुलामधून अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या ते पिस्तूल अवैध असल्याचं बोललं जात आहे. अभिषेक घोसाळकर, ज्याने गोळीबार केला. तो मॉरिस नरोना आणि मेहूल पारेख पोलिसांनी आता या प्रकरणात मेहुल पारेखला ताब्यात घेतलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here