Murder : नगर : केडगाव येथील एका ३५ वर्षीय युवकाचा मारहाण करून खून (Murder) करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले आहेत. लुटमारीच्या घटनेतून खून झाला असलयाचे पोलीस (Police) तपासात समोर आले आहे.
नक्की वाचा : शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार
कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
संदेश संजय क्षेत्रे (वय २५, रा.भुषणनगर, केडगाव), अमन असीरमिया शेख (वय २३, रा.शिवाजीनगर, केडगाव, अहिल्यानगर) व मंगेश कालीदत्त कांबळे (वय २१, रा.भुषणनगर, केडगाव, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. बोबडा अनार सिंह (वय ३५, रा.सुखपुरी, जैनाबाद, बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. केडगाव औद्योगिक वसाहतीत एक अनोळखी तरूणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. दरम्यान, तरूणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा मारहाणीमुळे मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अवश्य वाचा : विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू; पाथर्डी तालुक्यातील घटना
लाकडी काठी व दगडाने जबर मारहाण करून खून (Murder)
या घटनेच्या समांतर तपास करत असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेषणानुसार हा गुन्हा संदेश क्षेत्रे याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता आरोपी हे दुचाकीवरून स्वस्तिक चौक येथून केडगावकडे जात असताना रस्त्यावर थांबलेल्या अनोळखी व्यक्तीस लुटमार करण्याच्या उद्देशाने त्यास दुचाकीवर बसून केडगाव इंडस्ट्रियल परिसरात नेऊन मारहाण केली. अनोळखी व्यक्तीकडील बॅग, खिशामधील पैसे व एटीएम कार्ड काढुन घेऊन, एटीएम पिन ची विचारणा केली. संशयित आरोपी संदेश संजय क्षेत्रे हा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता एटीएमचा पिनकोड चुकीचा असल्याने पैसे निघाले नाहीत. त्यामुळे आरोपींनी लाकडी काठी व दगडाने जबर मारहाण करून त्याचा खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार शाहीद शेख, संदीप पवार, फुरकान शेख, विजय ठोंबरे, रवींद्र घुंगासे, मयूर गायकवाड, भगवान थोरात, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे व भगवान धुळे यांच्या पथकाने केली.