Nagar Urban Bank : नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी दाेन संचालकांना अटक

0
Nagar Urban Bank

Nagar Urban Bank : नगर : नगर अर्बन (Nagar Urban Bank) घाेटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (ECONOMIC OFFENCE WING) आज माेठी कारवाई केली. त्यात नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक तथा नगर महापालिकेचे माजी नगरसेवक मनेष साठे व अनिल काेठारी यांंना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. उर्वरित संचालक (Director) अटकेच्या भीतीने पसार झाले असल्याचे समजते.

Nagar Urban Bank

हे देखील वाचा : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

विशेष पथकाची स्थापना (Nagar Urban Bank)

११३ वर्षांची परंपरा असलेली नगरच्या सहकार क्षेत्रातील महत्त्वाची बँक असलेल्या नगर अर्बन बँक अवसायनात निघाली आहे. १ हजार ३०० कोटी रुपयांपैकी तब्बल ९०० कोटी रुपये ठेवीदारांना मिळवून देण्याचं काम गेल्या काही वर्षांत झाले आहे. मात्र हा घोटाळा करणारा आणि व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट असलेला मुख्य आरोपी पोलिसांनी ताब्यात घेण्याऐवजी सोडून दिल्याचा आरोप ठेवीदारांकडून होत आहे. त्यामुळे संबंधित ठेवीदारांनी मंगळवारी (ता. २३) नगरच्या न्यायालयात धाव घेतली. नगर अर्बन सहकारी बँकेतील कर्ज गैरव्यवहार व आर्थिक घोटाळ्याच्या तपासासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. 

Nagar Urban Bank

अवश्य वाचा: प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी ‘या’ देशाचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे असणार

घोटाळ्याचा आकडा २९१ कोटीवर (Nagar Urban Bank)

बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत याचा तपास सुरू आहे. बँकेच्या सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट झालेले आहे. या संदर्भातील अहवाल मागील महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. यात हा घोटाळ्याचा आकडा २९१ कोटीच्या वर गेल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शाखाधिकारी राजेंद्र शांतीलाल लुनिया व प्रदीप जगन्नाथ पाटील या दोघांना अटक केली होती. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. एसआयटीने नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी पहिल्यांदाच तत्कालीन संचालकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. एसआयटीने आज तत्कालीन संचालक मनेष साठे व अनिल कोठारी यांना ताब्यात घेतले आहे. मनेष साठे हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here