Nana Patekar Viral Video: नाना पाटेकरांनी मारली चाहत्याच्या कानशिलात; व्हिडिओ व्हायरल  

अभिनेते नाना पाटेकर आगामी 'जर्नी' या सिनेमाचं शूटिंग करत असताना एक व्यक्ती नानांसोबत सेल्फी घेण्यासाठी आलेली दिसत आहे.

0
210

नगर : अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या ‘जर्नी’ (Journey) या सिनेमाचं शूटिंग करत आहेत. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी चाहत्याच्या कानाखाली वाजवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर आता नाना पाटेकर यांनी स्पष्टीकरण दिल आहे.

नक्की पहा : विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर;आजपासून विठ्ठलाचे २४ तास दर्शन 

अभिनेते नाना पाटेकर आगामी ‘जर्नी’ या सिनेमाचं शूटिंग करत असताना एक व्यक्ती नानांसोबत सेल्फी घेण्यासाठी आलेली दिसत आहे. यावेळी नाना त्याच्या कानाखाली वाजवताना पाहायला मिळालेत. चाहत्याच्या कानाखाली वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पाटेकरांनी एक व्हिडीओ शेअर करत या घटनेबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

अवश्य वाचा :  मनोज जरांगेची मोठी घोषणा ; २४ डिसेंबरनंतर ‘या’ ठिकाणी आंदोलन सुरु  


या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर म्हणाले,”व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत असलेली घटना ही माझ्या आगामी ‘जर्नी’ या सिनेमाचा भाग आहे. या सिनेमात मी डोक्यावर टोपी घातली असून एक व्यक्ती मला म्हणत आहे,”ए म्हाताऱ्या तुझ्या डोक्यावर असलेली टोपी विकायची आहे का?”. त्यावर मी त्या व्यक्तीला मारतो आणि पळवून लावतो”.  “जेव्हा ही घटना घडली तेव्हा या दृश्याची तालिम सुरू होती. पण कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ शूट करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला पण तोपर्यंत तो मुलगा तिथून निघून गेला होता”.

नाना पुढे म्हणाले की,”मी असं कधीच वागत नाही. कधीही कोणावर हात उचलत नाही. उलट लोकांवर खूप प्रेम करतो. पण नकळत झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागतो. बनारसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असूनही शूटिंगदरम्यान मला अनेक लोकांकडून पाठिंबा मिळत आहे. स्थानिक लोक कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाहीत”,असंही  त्यांनी यावेळी सांगितले.