Sunny Leone New Song : सनीचं लिओनीचे नवीन गाणं ‘थर्ड पार्टी’ प्रदर्शित

IAS अभिषेक सिंहने सनी लिओनीसोबत नवं रॅप साँग लॉन्च केलं आहे.

0
184

नगर : आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी सनी लिओनी (Sunny Leone) सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारण सनीचं ‘थर्ड पार्टी’ (Third Party) हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. कमी कालावधीत  या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यात सनी लिओनीसह आयएएस अभिषेक सिंह थिकरताना दिसत आहे.

नक्की पहा : नाना पाटेकरांनी मारली चाहत्याच्या कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

IAS अभिषेक सिंहने सनी लिओनीसोबत हे नवं रॅप साँग लॉन्च केलं आहे. ‘मेरी पार्टी में कोई थर्ड पार्टी नहीं’ असे या गाण्याचे बोल आहेत. अभिषेक सिंहने स्वत: हे गाणं गायलं आहे. टी-सीरिजच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात अभिषेक सिंहने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर लाल रंगाचं टीशर्ट परिधान केलं आहे. तर दुसरीकडे सनी लिओनीनेदेखील लाल रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. ‘थर्ड पार्टी’ हे गाणं 2 मिनिट 53 सेकंदाचे आहे.

अवश्य वाचा : विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर;आजपासून विठ्ठलाचे २४ तास दर्शन 

‘थर्ड पार्टी’ या गाण्याबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला,”थर्ड पार्टी’ हे गाणं मी स्वतः लिहिलं आणि गायलं आहे.आजच्या तरुणांना हे गाणं नक्कीच आवडेल”. टीसीरिजच्या बॅनरअंतर्गत ‘थर्ड पार्टी’ या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

सनी लिओनी या गाण्याबद्दल म्हणाली की,”एका आयएएस अधिकाऱ्यासोबत मी थिरकत आहे, या गोष्टीचा मला फरक पडत नाही. अभिषेक हा एक उत्तम कलाकार आहे. त्याच्यासोबत काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचे तिने सांगितलं.