National Congress : नगर जिल्ह्यातून 10 हजार काँग्रेस कार्यकर्ते नागपूरला जाणार

National Congress: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने 138 व्या काँग्रेस स्थापना दिन निमित्ताने नागपूर येथे होत असलेल्या सभेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

0
National congress Party

संगमनेर: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या (National Congress Party) वतीने 138 व्या काँग्रेस स्थापना दिन (Congress Foundation Day) निमित्ताने नागपूर (Nagpur) येथे होत असलेल्या सभेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी (Soniya Gandhi), खासदार राहुल गांधी (Rahul gandhi), प्रियंका गांधी यांचे सह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यातून दहा हजार कार्यकर्ते जाणार आहेत.

नक्की वाचा : सहकारमहर्षी चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी सुरु

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने नागपूर सभेसाठी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव धीरज गुजर, योगेंद्र बंटी पाटील, आमदार लहू कानडे, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र नागवडे, करण ससाणे, हेमंत ओगले, नगर शहराध्यक्ष किरण काळे, ज्ञानदेव वाफारे, बाबासाहेब दिघे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, सचिन गुजर, हिरालाल पगडाल गणपतराव सांगळे, अशोक कानडे, सुरेश थोरात, संतोष हासे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, नवनाथ आरगडे, सुभाष सांगळे, ज्ञानेश्वर मुरकुटे, अर्चना बालोडे, पद्माताई थोरात, सुधाकर नवले, आनंद वरपे, आकाश नागरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

अवश्य वाचा : ३१ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत पुणे-नगर मार्गावरील वाहतुकीत बदल

यावेळी धीरज गुजर म्हणाले, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्याची वाटचाल अतिशय चांगली आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाची धुरा अत्यंत सक्षमपणे संभाळली. काँग्रेस पक्षाला सन्मान जनक परिस्थितीमध्ये आणून ठेवले तसेच 44 आमदारही निवडून आणले. अडचणीच्या काळात ज्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला साथ दिली, अशाच नेत्यांना जनता कायम लक्षात ठेवते असे ते म्हणाले.


आमदार कानडे म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते आज नागपूरला रवाना होणार आहेत. नगर जिल्ह्यामध्ये आमदार थोरात यांनी कायमच पक्षाला बळ देण्याचे काम केले आहे. पुढील काळामध्ये महाविकास आघाडीला चांगले दिवस येणार असल्याचेही ते म्हणाले.


राजेंद्र नागवडे म्हणाले, नागपूरला जाण्यासाठी नगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागपूरला जाणार आहे .नगर जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेससाठी अतिशय चांगले वातावरण असून प्रत्येक तालुकाध्यक्षांनी मोठ्या ताकतीने कामाला लागावे असेही आव्हान यावेळेस करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ज्ञानदेव वाफारे म्हणाले, नगर जिल्ह्यामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व तालुका अध्यक्षांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठ्या ताकतीने काम करायचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी केले तर आभार सुभाष सांगळे यांनी मानले. यावेळी विविध तालुक्यांमधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here