NCP : शरद पवार गटाला धक्का; राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच, निवडणूक आयोगाचा निर्णय

NCP : शरद पवार गटाला धक्का; राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच, निवडणूक आयोगाचा निर्णय

0
NCP

NCP : नगर : अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने (Election Commission) दिला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या बाजूने लागला असून हा शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालंय.

NCP

हे देखील वाचा: नगर जिल्ह्यात नवीन एमआयडीसी; ‘या’ गावात ६१८ एकरमध्ये उभारली जाणार उद्याेग नगरी

७ फेब्रुवारीपर्यंत मुदत (NCP)

निवडणूक आयाेगाने शरद पवार गटाने ७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आम्ही आतिशय आनंदी आहोत. निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय देत शिक्कामोर्तब केलं आहे.

नक्की वाचा: मनाेज जरांगे पाटील यांचा राज्याचा दाैरा; १० फेब्रुवारीला आमरण उपाेषण करणार

राज्यातील जनतेचा फार मोठा पाठिंबा पाठबळ – तटकरे (NCP)

NCP

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राज्यात अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावेल आणि राज्यातील जनतेचा फार मोठा पाठिंबा पाठबळ आम्हाला मिळेल, असा विश्वास मी व्यक्त करतो असं तटकरे यांनी म्हटलं आहे. शरद पवार गटाला काेणते चिन्ह आणि नाव मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले. तसंच, जवळपास ७ मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथही घेतली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले. गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं प्रकरण प्रलंबित होतं. गेल्या सहा महिन्यांत याप्रकरणी दहा सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या. या प्रत्येक सुनावणीत शरद पवार जातीने हजर होते. अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयाेगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्ष नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आय़ोगाने दिले आहेत.  त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालंय.

NCP

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here