Lawyers : श्रीरामपूर वकील संघाचे कामबंद आंदोलन सुरूच

Lawyers : श्रीरामपूर वकील संघाचे कामबंद आंदोलन सुरूच

0
Lawyers

Lawyers : श्रीरामपूर : राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या खुनाच्या (Murder) निषेधार्थ व वकिलांसाठी संरक्षण कायदा (Lawyers Protection Act) पारित करावा, या मागणीकरीता श्रीरामपूर वकील (Lawyers) संघाचे कामबंद आंदोलन ९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरूच राहणार असल्याचा निर्णय संघाच्या नुकत्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

हे देखील वाचा: नगर जिल्ह्यात नवीन एमआयडीसी; ‘या’ गावात ६१८ एकरमध्ये उभारली जाणार उद्याेग नगरी

सहकार्य केले नसल्याने त्यांचा निषेध (Lawyers)


याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पदाधिकाऱ्यांनी म्हटले, की श्रीरामपूर वकील संघाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाच्या सदस्यांनी आझाद मैदान मुंबई येथे जमलेल्या महाराष्ट्रातील हजारो वकिलांच्या मोर्चास कोणतेही सहकार्य केले नसल्याने त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या खुनाच्या निषेधार्थ व वकिलांसाठी संरक्षण कायदा पारीत करावा या मागणीकरिता श्रीरामपूर वकील संघाने ९ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कामकाजात सहभाग घ्यायचा नाही व तोपर्यंत साखळी उपोषण कायम सुरूच ठेवायचे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या दरम्यान कोणतेही दस्त नोंदणी करायचे नाही, वकील एकजुटीचा विजय होण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, सर्वांनी एकत्र येऊन साखळी उपोषण करून निषेध व्यक्त करावा, असे आवाहन करण्यात आले.

नक्की वाचा: मनाेज जरांगे पाटील यांचा राज्याचा दाैरा; १० फेब्रुवारीला आमरण उपाेषण करणार

आंदोलनात सहभाग (Lawyers)


पत्रकावर अध्यक्ष विष्णू ताके, उपाध्यक्ष सुभाष जंगले, महिला उपाध्यक्ष मनिषा वर्मा, सचिव कैलास आगे, खजिनदार अण्णासाहेब मोहन आदींच्या सह्या आहे. बैठकीस बी. डी. घाडगे, बी. एफ. चुडिवाल, व्ही. के. पटारे, समीन बागवान, महेंद्र आढाव, सर्जेराव घोडे, सुशील पांडे, जे. पी. कदम, जावेद शेख, बाबासाहेब ढोकचौळे, ज्ञानेश्वर वानखेडे, विनोद तोरणे, बाबासाहेब मुठे, सौरव गदिया, मीना विखे, अजित परदेशी, संदिप चोरमल, रमेश चौधरी, सुनिल शेळके, बाळासाहेब भोसले, हर्षल गोरे, मुमताज बागवान, सतिष डोंगरे, सुहास चुडिवाल, दत्तात्रय जगधने, दीपक कोकणे, कारभारी रोकडे, विजय साळुंके, सुभाष बिहाणी, जगन्नाथ राठी, रावसाहेब मोहन, दादासाहेब औताडे, पंकज औताडे, आरीफ शेख, अरूण लबडे, बापूसाहेब इंगळे, शाम खर्डे, कुंदन परदेशी, प्रमोद आवारे, शफी शेख, संजय तांबे, भानुदास तांबे आदी वकील बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here