New Year : नगर : नवीन वर्षाची (New Year) चाहूल लागताच अनेकांचे अनेक संकल्प ठरवले जात असतात. अनेक जण फिरायला जाण्याच्या योजना ठरवत असतात. पण त्यासाठी हव्या असणाऱ्या सुट्ट्यांची (holiday) चर्चाही लगेच सुरु होत असते. अशा अनेकांसाठी येणारे वर्ष भरपूर सुटया घेऊन येणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात रविवार व शनिवार (शनिवार सुट्टी ग्राह्य धरून) अश्या सुट्ट्या सोडून २५ सुट्ट्या असल्याचे राज्य शासनानं (State Govt) जाहीर केले आहे.
हे देखील वाचा : भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरवात
महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झालेल्या सुट्ट्यांपैकी 9 सुट्ट्या या शनिवार आणि रविवारला लागूनच आल्या असल्याने सर्वांना सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.
वर्षाच्या सुरुवातीची सुट्टी 26 जानेवारीला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त मिळणारी सुट्टी शुक्रवारी येत असल्याने शनिवार आणि रविवार जोडून येत आहेत. जानेवारीत 4 रविवार आणि 4 शनिवार असल्याने जानेवारीमध्ये ऐकून 9 सुट्ट्या असणार आहे.
नक्की वाचा : नगरमध्ये स्वच्छतेविषयी आगळी वेगळी स्पर्धा
फेब्रवारीमध्ये 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (इंग्रजी तारखेनुसार) आहे. यामुळे फेब्रुवारीमध्ये 4 रविवार आणि 4 शनिवार आहेत. फेब्रुवारीमध्ये 5 डेज विकनुसार 9 सुट्ट्या असणार आहे.
मार्च महिन्यामध्ये 3 सुट्ट्या असून या तिन्ही सुट्ट्या शनिवारी आणि रविवारला लागून येणार आहेत. त्यामुळे फिरायला जाणाऱ्यांना खास प्लॅन बनवता येणार आहेत. मार्चमध्ये 5 रविवार आणि 5 शनिवार असल्याने फेब्रुवारीमध्ये एकूण 13 सुट्ट्या असणार आहेत.
एप्रिल महिन्यामध्ये गुढीपाडवा, रमजान ईद आणि राम नवमी या सणांमुळे 3 अतिरिक्त सुट्ट्या असणार आहेत. यंदाच्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रविवारी आहे. एप्रिलमध्ये 4 रविवार आणि 4 शनिवार आहेत. एप्रिलमध्ये एकूण 11 सुट्ट्या असतील.
मे महिन्यामध्ये 1 तारखेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनामित्त सुट्टी आहे. यासोबत बुद्ध पौर्णिमेची सुट्टी असणार आहे. मे महिन्यामध्ये 4 रविवार आणि 4 शनिवार अश्या एकूण 10 सुट्ट्या असणार आहेत.
जूनमध्ये 15 आणि 16 तारखेला शनिवार रविवार सुट्टी असणार आहे, तर 17 तारखेला बकरी ईदची सुट्टी आहे. त्यामुळे सलग तीन सुट्ट्या मिळणार आहेत. तीन दिवसांच्या पिकनिकचा प्लॅन बनवणाऱ्यांसाठी ही चांगलीच पर्वणी ठरणार आहे. जूनमध्ये 5 रविवार आणि 5 शनिवार आहेत. अश्या एकूण 11 सुट्ट्या असणार आहेत.
जुलै महिन्यामध्ये बुधवारी, 17 तारखेला मोहरमची सुट्टी असणार आहे. या महिन्यात एकच अतिरिक्त सुट्टी असणार आहे. जुलै महिन्यामध्ये 4 रविवार आणि 4 शनिवार अश्या एकूण 9 सुट्ट्या असणार आहेत.
ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्टची सुट्टी गुरुवारी येत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये 4 रविवार आणि 5 शनिवार आहेत. अश्या प्रकारे ऑगस्टमध्ये एकूण 10 सुट्ट्या असणार आहेत.
सप्टेंबर महिन्यामध्ये गणेश चतुर्थीची, ईद-ए-मिलाद व अनंत चतुर्दशीची सुट्टी असणार आहे. या महिन्यामध्ये 14 ते 17 असा लाँग विकेण्डसाठी प्लॅन बनवता येईल. सप्टेंबर महिन्यामध्ये 5 रविवार आणि 4 शनिवार अश्या एकूण 11 सुट्ट्या असतील.
ऑक्टोबरमध्ये गांधी जयंती व दसऱ्याची सुट्टी आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये 4 रविवार आणि 4 शनिवार आहेत. अश्या ऑक्टोबरमध्ये एकूण 9 सुट्ट्या असणार आहेत.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तिन्ही दिवशी लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि दीवाळी पाडवा असल्याने सुट्टी असणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाकडून 3 नोव्हेंबरला भाऊबीजेची सुट्टी जाहीर केलेली असली तरी, रविवार असल्यामुळं ती सुट्टीही साप्ताहिक सुट्टीमध्येच जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये 4 रविवार आणि 5 शनिवार आहेत. अश्या प्रकारे ऑक्टोबरमध्ये एकूण 10 सुट्ट्या असणार आहेत.
डिसेंबरमध्ये नाताळाची सुट्टी असणार आहे. डिसेंबरमध्ये एकच अतिरिक्त सुट्टी असणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये 5 रविवार आणि 5 शनिवार अश्या एकूण 10 सुट्ट्या असणार आहेत.