OBC : नगरमध्ये उद्या ओबीसी महाएल्गार मेळावा; लाखोंच्या गर्दीचे नियोजन

OBC : नगरमध्ये उद्या ओबीसी महाएल्गार मेळावा; लाखोंच्या गर्दीचे नियोजन

0
OBC
OBC

OBC : नगर : मराठा आंदोलनाच्या यशानंतरचा पहिलाच आरक्षण (Reservation) बचाव महाएल्गार मेळावा ३ फेब्रुवारीला नगरला होत आहे. त्यामध्ये लाखो लोकांना एकत्र आणून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. मेळाव्याला ओबीसींचे (OBC) नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.  नगर शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर ३ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता हा मेळावा होणार आहे. मेळाव्याला ओबीसीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, आमदार राम शिंदे, कल्याणराव दळे, प्रा. लक्ष्मण गायकवाड, शब्बीरभाई अन्सारी, पी. टी. चव्हाण, दौलतराव शितोळे, सत्संगजी मुंढे, प्रा. लक्ष्मण हाके हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

हे देखील वाचा: नगर रायझिंग हाफ मॅरेथॉनमध्ये रविवारी धावणार नगरकर

मराठा समाजाला स्वतंत्र वर्गातून आरक्षण द्यावे ही भूमिका (OBC)


मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध नाही. परंतु ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र वर्गातून आरक्षण द्यावे ही भूमिका ओबीसी समाजाची आहे. या मेळाव्याला नगर जिल्ह्यातून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत.

OBC

नक्की वाचा: दुचाकी चोरी करणारे तिघे गजाआड

येथे असणार पार्किंगची व्यवस्था (OBC)

या सभेसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर शहरातील पार्किंगची व्यवस्था पांजरापोळ संस्थेचे मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ, मार्केट यार्ड चौक, वायएमसी मैदान, खालकर हॉस्पिटल जवळ, अहमदनगर बॉईज हायस्कूल मैदान, कोठी रोड येथे करण्यात आलेली आहे. सभेच्या ठिकाणी अप्लोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here