Padmashali Society : पद्मशाली समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बिनविराेध निवड ; अध्यक्षपदी श्रीनिवास बाेज्जा, तर सचिवपदी अमित बुरा

Padmashali Society : पद्मशाली समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बिनविराेध निवड ; अध्यक्षपदी श्रीनिवास बाेज्जा, तर सचिवपदी अमित बुरा

0

Padmashali Society : नगर : पंच कमिटी पद्मशाली ज्ञाती समाज (Padmashali Society), श्री मार्कंडेय मंदिर देवस्थानचे विश्वस्त व पदाधिकाऱ्यांची बिनविराेध निवड झाली आहे. पद्मशाली समाजाच्या अध्यक्षपदी (President) श्रीनिवास बाेज्जा यांची, तर सचिव (Secretary) पदी ‘साेहम ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक (MD) अमित बुरा यांची निवड करण्यात आली आहे.

Padmashali Society : पद्मशाली समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बिनविराेध निवड ; अध्यक्षपदी श्रीनिवास बाेज्जा, तर सचिवपदी अमित बुरा
Padmashali Society : पद्मशाली समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बिनविराेध निवड ; अध्यक्षपदी श्रीनिवास बाेज्जा, तर सचिवपदी अमित बुरा

हे देखील वाचा : राज्यघटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा : शरद पवार

नुकतीच पद्मशाली समाजाच्या सभासदांची बैठक झाली. या बैठकीत घटनेप्रमाणे एकूण ५० विश्वस्थाची निवड करण्यात आली, अशी माहिती पद्मशाली समाजाचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश येनगंदुल यांनी दिली. पद्मशाली समाजातील ज्येष्ठ विश्वस्त प्रकाश येनगंदुल यांच्या अध्यक्षतेखाली निवड झालेले विश्वस्त म्हणून श्रीनिवास बोज्जा, त्रिलेश येनगंदुल, अमित बुरा, रवी दंडी, तिरमलेश पासकंठी, रितेश अनमल, शुभम सुंकी, शरद मडूर, श्रीनिवास बुरगूल, गिरीश चिट्टा,अमित बिल्ला, विनोद म्याना, लक्ष्मीकांत नल्ला, डॉ. गणेश श्रीगादी, सतीश पागा,  श्रीनिवास एल्लाराम, शंकर जिंदम, विनायक बोगा, गणेश विद्ये, अभिजीत अरकल, जोग दत्तात्रेय, अभिजीत चिप्पा, ज्ञानेश्वर पंतलू, वाय प्रकाश येनगंदूल, अंजय्या यंगल, कुमार आडेप, राजेश लयचेट्टी, महेश रच्चा, संजय बाले, नारायण मंगलाराम, दत्तात्रय रासकोंडा,  विनायक बत्तीन, सागर सब्बन, राजेंद्र इगे, पुरुषोत्तम बुरा, श्रीनिवास वंगारी, संजय वल्लाकट्टी, पुरुषोत्तम सब्बन, प्रणित अनमल, धनंजय येनगुपटला, गणेश चेन्नूर, विलास दिकोंडा, गणेश क्यातम, अजय गुरुड, अंबादास गोटीपामुल, अमोल गाजेंगी, बालाजी गोणे, राजू गाली, दत्त्तात्रय जोग या विश्वस्तांमधून पंचकमिटी पद्मशाली ज्ञाती समाजाच्या अध्यक्षपदी श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्षपदी त्रिलेश येनगंदुल, सचिवपदी अमित बुरा, सहसचिवपदी रवी दंडी व खजिनदारपदी तिरमलेश पासकंठी यांची एकमताने बिनविरोध निवड केली.

नक्की वाचा : स्वच्छतेतून आरोग्याकडे; महापालिका, ‘हायजिन फर्स्ट’ व ‘आय लव्ह नगर’चा उपक्रम कौतुकास्पद : अरुण जगताप

यानंतर समाजातील घटनेप्रमाणे पंचकमिटी पद्मशाली ज्ञाती समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बोज्जा यांनी श्री मार्कंडेय मंदिर देवस्थानच्या अध्यक्षपदी गणेश विद्ये, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर मंगलारप, सचिवपदी सतीश पागा, सहसचिवपदी विनायक बोगा व खजिनदारपदी प्रणित अनमल यांची व कार्यकारणी सदस्य म्हणून गिरीश चिट्टा, अंजय्या यंगल, अभिजित अरकल, शरद मडूर, महेश रच्चा, विनोद म्याना आदींची निवड केली. यावेळी नवनिर्वाचित दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करून इतर विश्वस्थांनी शुभेच्छा दिल्या. समाजातील एकमेव श्री मार्कंडेय मंदिर जीर्णोद्धारबाबत चर्चा होऊन मंदिराचे सभा मंडपाचे काम लवकरच सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले.

या वेळी श्रीनिवास बोज्जा म्हणाले, ”माझी निवड केल्यामुळे मी सर्व विश्वस्त व अखंड पद्मशाली समाजाचे आभार मानतो व या पुढे समाजातील छोट्या घटकापासून सर्व समाज बांधवांच्या सामाजिक व आर्थिक विकास होण्याचे दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.” श्री मार्कंडेय देवस्थान कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश विद्ये म्हणाले, ”श्री मार्कंडेय मंदिराला १०० वर्षे पूर्ण झाले आहे. या मंदिराचे जीर्णोद्धार व सभा मंडपाचे बांधकाम करणे हाच माझा उद्देश आहे. हे काम माझ्या कारकिर्दीत पूर्ण करण्याचा मानस असून त्यासाठी सर्व विश्वस्त व संपूर्ण पद्मशाली समाजाने मला सहकार्य करावे, असे आवाहन केले. शेवटी उपस्थित सर्व विश्वस्थांचे आभार संस्थेचे नवनिर्वाचित सचिव अमित बुरा यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here