Sridevi Prasanna :’श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; सई -सिद्धार्थची लव्हस्टोरी पहाच !

Sridevi Prasanna : मराठीसोबतच बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री सई ताम्हणकर आणि मराठीतला आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर पहिल्यांदाच टीप्स मराठीच्या श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

0
Shridevi Prasanna

Sridevi Prasanna : नगर : मराठी मनोरंजन सृष्टीत (Marathi Movies) सातत्याने नवनवीन प्रयोग होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे २०२४ हे वर्ष खूपच खास असणार आहे. या वर्षात रोमँटिक, अॅक्शन, थ्रिलर, विनोदी, ऐतिहासिक असे वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.असाच एक नवा चित्रपट ‘श्रीदेवी प्रसन्न’ (Sridevi Prasanna) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट (Teaser out) झाला आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट ;शेतकऱ्यांची चिंता वाढली

लग्न का करावं, कुणाशी करावं याची प्रत्येकाची आपली अशी कारणं आणि कल्पना असतात. टीप्स मराठी(Tips Marathi) प्रस्तुत आणि कुमार तौरानी निर्मित श्रीदेवी प्रसन्न चित्रपट म्हणजे लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची कहाणी आहे. टीप्स मराठीचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. नवीन वर्षात टीप्स मराठी आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस देणार आहे.

अवश्य वाचा : सदाशिव लोखंडेंनी आखले नव्या राजकीय खेळीचे मनसुबे

मराठीसोबतच बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि मराठीतला आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) पहिल्यांदाच टीप्स मराठीच्या श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमधील सई-सिद्धार्थची केमिस्ट्री आणि संवादांची जुगलबंदी यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. विशाल विमल मोढवे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  

‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात सई आणि सिद्धार्थ यांसह  सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी अदिती मोघे यांनी उचलली आहे. तर मराठीतील प्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी यातील गाणी संगीतबद्द केली आहेत.

‘श्रीदेवी प्रसन्न’मध्ये काय आहे ?

‘श्रीदेवी प्रसन्न’ या सिनेमात ‘लव अॅट फर्स्ट साईट’चं स्वप्न मनात बाळगत प्रेमाच्या भन्नाट कल्पना विश्वात वावरणारा प्रसन्न मॅट्रिमोनी साइटवर ‘श्रीदेवी’ या नावाच्या उत्सुकतेपोटी तिला रिक्वेस्ट पाठवतो आणि ती अॅक्सेप्ट देखील करते. या दोन टोकांच्या माणसांची मनं जुळतात की नाही, भेट झाल्यानंतर त्यांच्यात नेमकं काय घडतं हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here