Jayant Patil : सोमय्यांचा वातावरण निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न : जयंत पाटील

Jayant Patil : नगर : राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्ष फोडूनही भारतीय जनता पक्षाला उपयोग होत नाही; म्हणून माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) हे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) व त्यांच्या कुटुंबावर आरोप करत आहेत.

0
Jayant Patil : सोमय्यांचा वातावरण निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न : जयंत पाटील
Jayant Patil : सोमय्यांचा वातावरण निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न : जयंत पाटील

Jayant Patil : नगर : राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्ष फोडूनही भारतीय जनता पक्षाला उपयोग होत नाही; म्हणून माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) हे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) व त्यांच्या कुटुंबावर आरोप करत आहेत. सोमय्यांनी आतापर्यंत केलेल्या आरोपाचा काय उपयोग झाला, हे सर्वांना ठाऊक आहे. शरद पवारांवरील आरोपांतून निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा प्रत्यारोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला.

हे देखील वाचा : राज्यघटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा : शरद पवार

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शरद पवार व त्यांच्या कुटुंबावर पीएपी घोटाळ्याचा आरोप केला. या आरोपाला जयंत पाटील यांनी प्रतिउत्तर दिले. शिर्डीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शिबिर होत आहे. या शिबिरात आमदार रोहित पवार अनुपस्थित आहेत. यावर पत्रकारांनी विचारले असता जयंत पाटील म्हणाले, या शिबिराचे वेळापत्रक जाहीर झाल्यावर रोहित पवार यांनी शिबिराच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहणार असल्याचे मला सांगितले होते. ते सध्या परदेशात आहेत. आज रात्री अथवा उद्या सकाळी ते या शिबिरात सहभागी होतील. मी गरीब माणूस आहे, माझा कोणाशी वाद नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

नक्की वाचा : स्वच्छतेतून आरोग्याकडे; महापालिका, ‘हायजिन फर्स्ट’ व ‘आय लव्ह नगर’चा उपक्रम कौतुकास्पद : अरुण जगताप

भाजपबाबत त्यांनी सांगितले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गल्ली बोळात फिरून पंतप्रधान कोण होणार हे विचारत आहेत. केंद्रात पुन्हा सत्ता मिळविण्याची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी ते अफवा पसरवित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त जागा मिळविण्याच्या सूचना त्यांच्या पक्षातील लोकांना दिल्या आहेत. संविधानात बदल करण्यासाठी मोदींना ४०० पेक्षाही जास्त जागा हव्या आहेत. आमच्या पक्षातील लोक दुसऱ्या विचारसरणीत सहभागी झाले. त्यामुळे पक्षात नवे नेतृत्त्व पुढे येत आहे. मागच्या फळीतील लोक पुढे येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे.

शिर्डीतील काँग्रेसच्या शहराध्यक्षा वर हल्ला झाला. या संदर्भात ते म्हणाले, राजकीय कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. देशात लोकशाही असताना, असे प्रकार घडत आहेत. लोकसभा निवडणूक जवळ आल्याने, असे प्रकार वाढत आहेत. हे हल्ले महाविकास आघाडीचे कार्यकर्ते परतवून लावतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here