Maharashtra Weather : महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट ;शेतकऱ्यांची चिंता वाढली 

Maharashtra Weather : राज्यातील काही भागात पुढील ४८ तासांत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे.

0
Maharashtra Weather

Maharashtra Weather : नगर : सध्या भारतासह महाराष्ट्रात (Maharashtra) थंडीची लाट अनुभवायला मिळत आहे. तर पुढील काही दिवसात देखील हवामानात बदल (Weather Update) होणार आहेत. देशासह राज्यातही काही भागात पावसाची शक्यता (Rain Alert) असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या २४ तासांत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नक्की वाचा : सदाशिव लोखंडेंनी आखले नव्या राजकीय खेळीचे मनसुबे

राज्यातील काही भागात पुढील ४८ तासांत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्यामुळे देशासह राज्यात काही ठिकाणी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसात काही भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा : राज्यघटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा : शरद पवार

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या हवामानावरही परिणाम होणार आहे. पुढील काही दिवसात मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे, असं आयएमडीने म्हटलं आहे.

पूर्व आणि उत्तरेकडील वाऱ्यांचा वेग वाढणार असून याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होणार आहे. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असून हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. अवकाळी पावसाने शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदील झाला आहे. त्यातच आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here