Poonam Pandey Death : प्रसिद्ध अभिनेत्री पुनम पांडेचं निधन

मनोरंजन क्षेत्रात आपल्या हटके स्टाईल आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असणाऱी सेलिब्रेटी पुनम पांडेचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.

0
Poonam Pandey
Poonam Pandey

नगर : मनोरंजन क्षेत्रात आपल्या बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत असलेली सेलिब्रेटी पुनम पांडेचं निधन (Poonam Pandey) झाल्याची बातमी समोर आली आहे. तिच्या इंस्टा अकाउंटवरुन आलेल्या या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गर्भाशयाच्या कँसरनं (uterine cancer) पुनमचे निधन झाले आहे. तिच्या इंस्टावरील पोस्टनं चाहत्यांना धक्का बसला आहे. तिच्या टीमकडून इंस्टावर व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टनं मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा : तेजश्री प्रधानच्या ‘लोकशाही’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट  

 कोण आहे पूनम पांडे ? (Poonam Pandey Death) 

पूनमने गेल्या वर्षी कंगनाच्या लॉकअप नावाच्या रियॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यातून पुनमची लोकप्रियता वाढली होती. तिने अनेकदा बॉलीवूडमधील सेलिब्रेटींशी पंगा घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे तिला नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. गुरुवारी (ता.१) रात्री पुनमचे कानपूर येथे असणाऱ्या पुनमच्या राहत्या घरी तिचं निधन झाले आहे. तिच्या अंत्यसंस्काराविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अवश्य वाचा : ‘आता वेळ झाली’ चित्रपटाची घोषणा ; दिलीप प्रभावळकर व रोहिणी हट्टंगडी मुख्य भूमिकेत  

पुनम पांडेच्या इंस्टा अकाउंटवरुन तिच्या टीमनं माहिती देत सांगितले की, हे सांगणं आमच्यासाठी खूपच धक्कादायक आहे. तिला सर्व्हिकल कँसर झाला होता.आमच्यासाठी हा मोठा संघर्षाचा काळ आहे. ज्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण मोठ्या धक्क्यात आहोत. तिचं असं अकाली जाणं आपल्या सर्वांसाठी मोठं धक्कादायक आहे.

पुनम पांडेची चित्रपटातील कारकीर्द ?(Poonam Pandey Death) 

पुनमच्या चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास तिनं २०१३ मध्ये बॉलीवूडमध्ये इंट्री केली. तिच्या फारसे चित्रपट काही आले नाही. तिनं तिच्या बोल्डनेसमधून काही काळ प्रेक्षकांचे मनोरंजन  करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या द जर्नी ऑफ कर्मा, मालिनी अँड कंपनी, दिल बोले हडिप्पा नावाच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता.छोट्या पडद्यावरील ‘आशिकी तुमसेही’, ‘नादानिया’, फिअर फॅक्टर : खतरो के खिलाडी या शोमध्ये देखील ती झळकली होती. तिच्या निधनाने मात्र चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here