Theft : दुचाकी चोरी करणारे तिघे गजाआड

Theft : दुचाकी चोरी करणारे तिघे गजाआड

0
Accused
Accused

Theft : नगर : दुचाकी चोरून (Theft) तिची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज जेरबंद केले. राहुल विजय निकम (वय २४, रा. विळद घाट, ता. नगर), बंडू सुदाम बर्डे (वय २९, रा. देहरे, ता. नगर) व अरुण बाळासाहेब धिरोडे (वय २५, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत. या आरोपींकडून चोरी करून विकलेल्या सात दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या आहेत.

हे देखील वाचा: नगर रायझिंग हाफ मॅरेथॉनमध्ये रविवारी धावणार नगरकर

सापळा रचून संशयित आरोपी निकम ताब्यात (Theft)

जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोटार सायकल चोरांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरांची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार पथकाला माहिती मिळाली की, राहुल निकम हा दुचाकी चोर विळद घाट येथील बाह्यवळण रस्ता परिसरात चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित आरोपी निकमला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील दुचाकी संदर्भात विचारपूस केली असता त्याने दुचाकी चोरीचा गुन्हा बंडू बर्डे व अरुण धिरोडे यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.

नक्की वाचा: राज्यातील निवासी डॉक्टर ‘या’ दिवशी जाणार संपावर

सहा लाख ३० हजारांच्या दुचाकी हस्तगत (Theft)

त्यानुसार पथकाने इतर दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. नगर जिल्ह्यातील संगमनेर, एमआयडीसी व निंबळक परिसरातून चोरीच्या चार दुचाकी तर पुणे जिल्ह्यातील शिरूर व आळेफाटा परिसरातून चोरी केलेल्या तीन दुचाकी हस्तगत केल्या. या सात दुचाकींची किंमत अंदाजे सहा लाख ३० हजार रुपये आहे. पथकाने पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here