Prahar : …अन्यथा खडका येथील टोलनाक्याचे नामोनिशाणही मिटवून टाकणार; ‘प्रहार’चा आक्रमक पवित्रा

Prahar : …अन्यथा खडका येथील टोल नाक्याचे नामो निशाणही मिटवून टाकणार; 'प्रहार'चा आक्रमक पवित्रा

0
Prahar : …अन्यथा खडका येथील टोल नाक्याचे नामो निशाणही मिटवून टाकणार; 'प्रहार'चा आक्रमक पवित्रा
Prahar : …अन्यथा खडका येथील टोल नाक्याचे नामो निशाणही मिटवून टाकणार; 'प्रहार'चा आक्रमक पवित्रा

Prahar : नगर : नगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) महामार्गावर असलेल्या खडका फाटा येथील केटी संगम टोलनाक्यावर (toll booth) रस्ता सुरक्षा अधिनियमाचे पूर्णतः उल्लंघन होत आहे. त्यामुळं प्रहार जनशक्ती पक्षातर्फे (Prahar Janshakti Party) रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत रीतसर तक्रार करणार आहे. तरीही या टोलनाक्यावर प्रवाशांसाठी असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून न दिल्यास तसेच रस्त्यची कायमस्वरूपाची दुरुस्ती न केल्यास, हा टोला कायमस्वरूपी बंद करून त्याचे नाव निशाणही मिटविले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे (Abhijeet Pote) यांनी दिला. 

Prahar : …अन्यथा खडका येथील टोल नाक्याचे नामो निशाणही मिटवून टाकणार; 'प्रहार'चा आक्रमक पवित्रा
Prahar : …अन्यथा खडका येथील टोल नाक्याचे नामो निशाणही मिटवून टाकणार; ‘प्रहार’चा आक्रमक पवित्रा

हे देखील वाचा : आता मुलांच्या नावापुढे वडिलांआधी आईचे नाव लागणार; उपमुख्यमंत्री अजित पवार


प्रहार जनशक्ती पक्षातर्फे टाेल नाक्याची पाहणी करण्यात आली. यावेळी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पूर्णतः उल्लंघन होत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात आले. जिल्हाध्यक्ष पोटे यांनी या टोल नाक्याच्या परिसराची संपूर्ण पाहणी करून येथील वास्तविकता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेसमोर मांडली. पाेटे म्हणाले, दरवर्षी रस्ता सुरक्षा समितीच्या होणाऱ्या बैठकीमध्ये या रस्त्याच्या संदर्भात प्रहारतर्फे वेळोवेळी भूमिका मांडून हा रस्ता अतिशय धोकादायक झालेला आहे. 

नक्की वाचा : ‘फिल्डींग कशी लावायची ते माझ्यावर सोडा’: राधाकृष्ण विखे पाटील


या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना टोल देण्याइतकी या रस्त्याची अवस्था आहे का? हा प्रश्न उपस्थित केला. हा टोलनाका निर्माण होऊन सुमारे पंधरा वर्षांचा कालखंड उलटूनही या ठिकाणी प्रवाशांसाठी असणाऱ्या विविध सुविधाांचा अभाव आहे. स्वच्छ पिण्याचे पाण्याची, स्वच्छतागृहे आदी अत्यंत महत्वाच्या मूलभूत अशा सुविधा नसल्याने प्रवाशांची, महिलांची, दिव्यांगांची, सामान्य नागरिकांची मोठी कुचंबना होत आहे. तसेच टोल नाक्यावर लहान मोठी वाहने ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. नाक्यावरच मोठ्या प्रमाणात रस्ता खराब असल्याने अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. केटी संगम यांनी शासनाबरोबर केलेल्या कराराच्या अनुषंगाने आज या ठिकाणी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही.

रस्ता सुरक्षा नियमांनाही केराची टोपली दाखवलेली दिसून येते. तसेच रस्त्यामध्ये असणाऱ्या दुभाजकावर किमान साडेतीन फूट झाडे असणे बंधनकारक आहे. कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूने रात्रीच्या वेळी वाहनांचा प्रकाश एकमेकांवर पडणार नाही. रस्त्यावरील गावानजीक गतिरोधक नाही. काही ठिकाणी असूनही त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे नसल्याने वाहनासह वाहन चालकाला उपचाराची गरज पडते. यामुळे अनेकांना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. रस्त्यावर अरुंद रस्त्याचे, वळण, दिशा दर्शवणारे, अरुंद पुलाचे फलक नाही. रस्त्याच्या मधोमध पांढऱ्या रंगाचे पट्टे देखील मारलेली नाही. अनेक ठिकाणी रस्ता फुटल्याने वाहनांना जाणे येण्यासाठी कसरत करून जीव धोक्यात घालावा लागत आहे.  या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहने घासून, टायर फुटून, वाहने पलटी होऊन मोठ्या प्रमाणात अपघात होणे, ही नित्याचीच बाब झालेली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. टोल नाक्याचे ठेकेदार व त्यांच्यावर नियंत्रण असणारे जागतिक बँकेचे प्रकल्प अधिकारी हे देखील या टोलनाक्याकडे केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून बघत आहे. नागरिकांसाठी, प्रवासासाठी असणाऱ्या सुविधेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे निदर्शनात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here