Gautami Patil: गौतमी पाटीलचं’चीझ मी लई कडक’गाणं प्रदर्शित;एकदा पहाच

Gautami Patil : गौतमीचं 'चीज लई कडक' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.या गाण्यात ती पोलीस ऑफिसर झालेली दिसून येत आहे.

0
Gautami Patil

नगर : गौतमी पाटील (Gautami Patil) ही नेहमीच आपल्या दिलखेचक नृत्यअदाने नेहमीच चर्चेत असते. गौतमीने आता मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण केलं आहे.घुंगरू’ (Ghungaroo) या सिनेमाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता गौतमीचं ‘चीज लई कडक’ (Cheese lai Kadak) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.या गाण्यात ती पोलीस ऑफिसर झालेली दिसून येत आहे.

नक्की वाचा : ‘फिल्डींग कशी लावायची ते माझ्यावर सोडा’: राधाकृष्ण विखे पाटील 

ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. असच प्रेक्षकांना वेड करणार एक गीत ‘कमरेचा ठेका मदनाचा झोका म्हणत अहो पाव्हणं चीझ मी लई कडक’ म्हणत गौतमीने प्रेक्षकांना थिरकायला लावेल आहे. सप्तसूर म्युझिकच्या (Saptsur Music) या नव्याकोऱ्या गाण्यात गौतमी पाटीलने नृत्य केले असून या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : एक व्यक्ती आदर्श घडला तर परिसराचा कायापालट होतो : विवेक कोल्हे

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी ‘चीझ लई कडक’ या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. विकी वाघ यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलेलं हे गाणं गायिका वैशाली सामंत यांनी गायलं आहे. तर या गाण्यात गौतमी पाटीलसह कुणाल पाटील, कुणाल मासले, मनोज कुंभार, आदम शेख यांनी भूमिका केली आहे.

‘चीझ लई कडक’ या गाण्यात एक गोष्ट सांगण्यात आली आहे. गुंडांच्या अड्ड्यावर होणाऱ्या या गाण्यात गौतमी पाटील नेमक काय करते हे जाणून घेण्यासाठी हा म्युझिक व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे. मात्र ‘चीझ लई कडक’ हे गाणं  ‘आयटम साँग ऑफ द ईअर’ ठरलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here