Private Universities Bills : अकोलेत खासगी विद्यापीठ विधेयकाची होळी

Private Universities Bills : अकोलेत खासगी विद्यापीठ विधेयकाची होळी

0
Private Universities Bills
Private Universities Bills

Private Universities Bills : अकोले : राज्य शासनाने महाराष्ट्र विधीमंडळात १८ डिसेंबर रोजी पारित केलेल्या खासगी विद्यापीठासंदर्भातील विधेयकामुळे (Private Universities Bills) गरीब विद्यार्थ्यांची दारे बंद होणार आहे. या नव्या विद्यापीठाच्या महाविद्यालयात शिकणारे कोणतेही गरीब विद्यार्थी (Students) यापुढे फ्रीशीप किंवा स्कॉलरशीप (Scholarship) सारख्या सवलतींपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे छात्रभारती संघटनेने मंगळवारी (ता.२३) अकोलेतील अगस्ति महाविद्यालयासमोर विधेयकाची होळी करुन तहसीलदारांना निवेदन दिले.

हे देखील वाचा : आयसीसीकडून वनडे टीम ऑफ द ईयर संघाची घोषणा ; भारताचे ‘या’ खेळाडूंना स्थान

ज्यांच्याकडे पैसा, त्यांनाच शिक्षणाची संधी (Private Universities Bills)


या विधेयकामुळे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच शिक्षणाची संधी भेटेल, अभी भीती छात्रभारती संघटनेने व्यक्त केली आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही त्या विद्यार्थ्यांना कितीही गुणवत्ता असली तरी त्यांना खासगी विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही. यामुळे गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणार असून, त्यांच्या शिक्षणावर गदा येणार आहे. या विधेयकाद्वारे स्थापन केलेले प्रत्येक विद्यापीठ हे स्वयं अर्थसहाय्यीत असेल. विद्यापीठ शासनाकडून कोणत्याही स्वरूपाचे इतर वित्तीय सहाय्य मिळण्यास हक्कदार असणार नाही आणि विद्यापीठात प्रवेश घेतलेला कोणत्याही प्रकारच्या वित्तीय सहाय्यासाठी किंवा शिष्यवृत्तीसाठी अथवा शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी राज्य शासनाकडे मागणी करण्यास हक्कदार राहणार नाही असे स्पष्ट केलेले आहे.

नक्की वाचा: श्रीराम चरणी नगर जिल्ह्यात तब्बल २१ लाख लाडूंचा विश्वविक्रमी नैवेद्य

खासगी विद्यापीठ विधेयक रद्द करण्याची मागणी (Private Universities Bills)

त्यामुळे हे खासगी विद्यापीठ विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी छात्रभारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, राज्य सहसंघटक गणेश जोंधळे, राज्य सदस्य विशाल शिंदे, जिल्हाध्यक्ष राहुल जर्‍हाड, हर्षला तळेकर, प्रांजली आरोटे, अवधूत नवले, विशाल पगारे, भावेश राक्षे, प्रथमेश शेटे, जीवन हासे, उद्धव टेमगिरे, ऋषीकेश पोगळे, यश कडलग, आकांक्षा डगळे, गायत्री आरोटे, सचिन गायकवाड, ऋषीकेश वाघ, सुदर्शन दातखिळे, प्रवीण भवारी, श्रीपाल डावरे, अवधूत नवले, दिव्या धुमाळ, साक्षी वाळुंज, महेश इघे, तेजस्विनी कानवडे,  यश कडलग, श्रृती वाळुंज यांनी अगस्ति महाविद्यालयासमोर विधेयकाची होळी करुन तहसीलदार सतीष थेटे यांना निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here