Virat Kohli Replacement : विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणा; आरसीबीच्या ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

Virat Kohli Replacement : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये २५ जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी बीसीसीआयने विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे.

0
Rajat Patidar
Rajat Patidar

नगर : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test) यांच्यामध्ये २५ जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी बीसीसीआयने विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची (Virat Kohli Replacement) घोषणा केली आहे. बीसीसीआयने विराट कोहलीच्या जागी पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी आरसीबीच्या रजत पाटीदार (Rajat Patidar) याला स्थान दिले आहे.

नक्की वाचा : आयसीसीकडून वनडे टीम ऑफ द ईयर संघाची घोषणा ; भारताच्या ‘या’ खेळाडूंना स्थान    

 भारताचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली. विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटसाठी सरफराज खान याच्या नावाचीही चर्चा सुरु होती. मात्र सरफराज खान ऐवजी रजत पाटीदार याला संधी देण्यात आली आहे. सरफराज खान इंडिया अ संघासोबतच राहणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी रजत पाटीदार भारतीय संघासोबत असणार आहे. गेल्या काही दिवसांतील शानदार खेळीमुळे रजत पाटीदार याला संधी मिळाली आहे.

अवश्य वाचा :  ‘लग्नकल्लोळ’ मधील मयुरी,सिद्धार्थ व भूषणचा फर्स्ट लूक समोर

रजत पाटीदारची शानदार खेळी (Virat Kohli Replacement)

रजत पाटीदारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून दमदार धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत ५५ फर्स्ट क्लास सामन्यात ४६ च्या जबरदस्त सरासरीने ४ हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये १२ शतके आणि २२ अर्धशतके आहेत. रजत पाटीदार भारताच्या अ संघाचा सदस्यही आहे. त्याने नुकताच इंग्लंड लॉयन्स विरोधात १५१ धावांची खेळी केली. भारतीय संघाने ५० धावांत सहा विकेट गमावल्या, तेव्हा रजतने १५१ धावांची खेळी केली होती.

इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया  – (Virat Kohli Replacement)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान.

हेही वाचा : मानुषी छिल्लर दिसणार “बडे मियाँ छोटे मियाँ” चित्रपटात 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here