Bade Miyan Chote Miyan:’बडे मिया छोटे मिया’चा जबरदस्त टीझर आऊट ; अक्षय व टायगर अ‍ॅक्शनमोडमध्ये

Bade Miyan Chote Miyan : 'बडे मिया छोटे मिया' या बहुप्रतिक्षित सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. धमाकेदार टीझरने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढवली आहे.

0
Bade Miyan Chote Miyan
Bade Miyan Chote Miyan

नगर : बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा अभिनय असलेला ‘बडे मिया छोटे मिया’ (Bade Miyan Chote Miyan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार टीझर आऊट झाला आहे. या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

नक्की वाचा : मानुषी छिल्लर दिसणार “बडे मियाँ छोटे मियाँ” चित्रपटात 

‘बडे मिया छोटे मिया’चा टीझर आऊट (Bade Miyan Chote Miyan)

‘बडे मिया छोटे मिया’ या सिनेमाच्या १ मिनिट ४१ सेकंदाच्या टीझरमध्ये दमदार डायलॉग आणि जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. या सिनेमात पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या सिनेमात सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमध्ये टायगर म्हणत आहे, “दिलसे सोल्जर और दिमागसे शैतान है हम”. तर अक्षय म्हणत आहे,”बचके रहना हमसे हिंदुस्थान है हम”.

अवश्य वाचा :  ‘लग्नकल्लोळ’ मधील मयुरी,सिद्धार्थ व भूषणचा फर्स्ट लूक समोर

 दिग्दर्शक अली अब्बास जफरने केले ‘बडे मिया छोटे मिया’ चे दिग्दर्शन (Bade Miyan Chote Miyan)

‘बडे मिया छोटे मिया’  या सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. तर पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हॉलिवूडच्या चित्रपटाप्रमाणे या सिनेमातील अॅक्शन सीन शूट करण्यात आले आहेत. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तर सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ, पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळतील.


हेही पहा : विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणा; आरसीबीच्या ‘या’ खेळाडूला मिळाली संधी  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here