Accident : नगर-कल्याण रस्त्यावर भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

Accident : नगर-कल्याण रस्त्यावर भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

0
Accident
Accident

Accident : नगर : नगर-कल्याण महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ठाणे-मेहकर एस.टी बस (ST Bus) व इको गाडी यांचा ढवळपुरी फाट्या नजीक (ता. पारनेर) आज (बुधवारी) पहाटे भीषण अपघात (Accident) झाला. यात सहा जण जागीच ठार झाले. या अपघातामुळे नगर-कल्याण महामार्गावरील (Nagar-Kalyan Highway) वाहतूक ठप्प झालेली होती.

हे देखील वाचा: आता माघार नाही, आरक्षण घेऊनच मागे परतणार : मनोज जरांगे पाटील

बसचे नियंत्रण सुटल्याने जोरदार धडक (Accident)

नगर-कल्याण महामार्गावर आज पहाटे एक उसाचा ट्रॅक्टर पलटी झालेला होता. त्याला मदत करण्यासाठी काही जण या ठिकाणी आले होते. त्याच वेळी नगर-कल्याणच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका बसचे नियंत्रण सुटल्याने त्याने मदत करणारे व्यक्ती तसेच समोरच्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.

Accident

अपघातग्रस्तांना तातडीने मदत (Accident)

पाच मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात तर एकाचा नगर येथे उपचार चालू असताना मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलीस पथक घटना स्थळी दाखल झाले आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्यात आली. आपघातग्रस्त वाहने बाजूला केली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. दरम्यान अपघातग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

नक्की वाचा: प्रभू श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठापना सोहळा पाहणे जीवनाचे भाग्य : नरेंद्र फिरोदिया

या घटनेतील मृतांची नावे

१. नीलेश रावसाहेब भोर – दसवडे
२. जयवंत रामभाऊ पारधी – जांबुत खुर्द
३. संतोष लक्ष्मण पारधी – जांबुत खुर्द
४. प्रकाश रावसाहेब थोरात – वारणवाडी
५. सचिन कांतीलाल मंडलेचा – टाकळी मानूर
६. अशोक चिमा केदार – जांबुत खुर्द

जखमीचे नावे

सुयोग अडसूळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here