Talathi Bharti Result : तलाठी भरती २०२३ ची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

Talathi Bharti Result : तलाठी भरती २०२३ची निवड यादी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर निवड यादीसोबत प्रतिक्षा यादीही जाहीर झाली आहे.महसूल विभागाकडून जिल्हानिहाय ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

0
Talathi Bharati 2023
Talathi Bharati 2023

नगर : राज्यात तलाठी भरती परीक्षेवरून वाद सुरु असताना २०२३ मध्ये झालेल्या या भरतीची निवड यादी (Selection List) जाहीर झाली आहे. या निवड यादीसोबत प्रतीक्षा यादीही (Wating List) जाहीर झाली आहे. महसूल विभागाकडून जिल्हानिहाय ही यादी जाहीर करण्यात आली आहे. तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यात ५७ सत्रांमध्ये घेण्यात आल्या होत्या.

नक्की वाचा : नगर-कल्याण रस्त्यावर भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

राज्यभरातून १० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिली तलाठी परीक्षा (Talathi Bharti Result)

तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदवले होते. या आक्षेपांपैकी एकूण ४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले. त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत.

अवश्य वाचा : विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणा; आरसीबीच्या ‘या’ खेळाडूला मिळाली संधी  

राज्यातील २३ जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर (Talathi Bharti Result)

महसूल विभागातून प्रसिद्ध केलेल्या या यादीमध्ये  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यांमधील तलाठी भरतीची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवाराची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी  होणार आहे. ही  नियुक्तीपुर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करण्यात येईल, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : ‘बडे मिया छोटे मिया’चा जबरदस्त टीझर आऊट ; अक्षय व टायगर अ‍ॅक्शनमोडमध्ये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here