ICC : आयसीसीकडून वनडे टीम ऑफ द ईयर संघाची घोषणा ; भारताचे ‘या’ खेळाडूंना स्थान  

ICC : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने वनडे टीम ऑफ द ईयर संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये भारतीय खेळाडूंचा वचक पाहायला मिळाला आहे.

0
ICC
ICC

नगर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने (ICC) वनडे टीम ऑफ द ईयर (ODI Team Of The Year) संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये भारतीय खेळाडूंचा वचक पाहायला मिळाला आहे. संघात आयसीसीने निवडलेल्या ११ खेळाडूंमध्ये भारताचे तब्बल सहा खेळाडू आहेत. विशेष बाब म्हणजे रोहित शर्माला आयसीसीने या संघाचा कर्णधार म्हणून निवडले आहे. त्याशिवाय विराट कोहलीसह अन्य सहा खेळाडूंना स्थान दिले आहे.

नक्की वाचा : आजपासून प्रभू श्रीरामाचं दर्शन सगळ्यांना घेता येणार

FILE PHOTO: The International Cricket Council (ICC) logo at the ICC headquarters in Dubai, October 31, 2010. REUTERS/Nikhil Monteiro/File photo

आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर संघात ‘या’ खेळाडूंना स्थान (ICC)

आयसीसीने निवडलेल्या वनडे टीम ऑफ द ईयर संघामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासिवाय मोहम्मद सिराज, मोहम्मद शामी आणि कुलदीप यादव यांना स्थान मिळाले आहे. तसेच रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर सलामीची जबाबदारी सोपवली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज ट्रेविस हेड याला तिसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. तर चौथ्या क्रमांकावर भारताचा फलंदाज विराट कोहली याला निवडले आहे. पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरेल मिचेल याला संधी दिली आहे. विकेटकिपर म्हणून आयसीसीने दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेन याला निवडले आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को यान्सन याला निवडले आहे.

अवश्य वाचा : ‘लग्नकल्लोळ’ मधील मयुरी,सिद्धार्थ व भूषणचा फर्स्ट लूक समोर

भारताचे तीन गोलंदाज (ICC)

आयसीसीने निवडलेल्या संघात भारतीय संघाचे तीन गोलंदाज आहेत. यामध्ये मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामी यांना संधी मिळाली आहे. तर फिरकीपटू कुलदीप यादव यालाही निवडले आहे. जसप्रीत बुमराह याला मात्र आयसीसीने संधी दिली नाही. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झम्पा याला दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. कुलदीप यादव आणि अॅडम झम्पा यांना आयसीसीने फिरकीची जबाबदारी दिली आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामी यांच्यावर आहे. आयसीसीने निवडलेल्या या संघात पाकिस्तानच्या मात्र  एकाही खेळाडूला स्थान मिळालेले नाही. त्याशिवाय इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका या संघातील एकाही खेळाडूला या संघात  स्थान मिळवता आले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here