Shri Ram Temple : श्रीराम चरणी नगर जिल्ह्यात तब्बल २१ लाख लाडूंचा विश्वविक्रमी नैवेद्य

Shri Ram Temple : श्रीरामा चरणी नगर जिल्ह्यात तब्बल २१ लाख लाडूंचा विश्वविक्रमी नैवेद्य

0
Shri Ram Temple
Shri Ram Temple

Shri Ram Temple : नगर : २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात (Shri Ram Temple) भव्यदिव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. या निमित्ताने देशभर दिवाळी (Diwali) सारख्या सणाचे आनंददायी वातावरण हाेते. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातही श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने असणारा उत्साह केवळ मोठाच नव्हे, तर विश्वविक्रमी (world record) झाल्याचे दिसून येत आहे. या दिवशी नगर जिल्ह्यात थोडे-नी-थिडके तब्बल २१ लाख लाडू श्रीराम चरणी नैवद्य म्हणूनअर्पिले आहेत.

नक्की वाचा : प्रभू श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठापना सोहळा पाहणे जीवनाचे भाग्य : नरेंद्र फिरोदिया

दीपावली सारखा सण साजरा (Shri Ram Temple)

दरम्यान, भाजपसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, धार्मिक संघटना, संस्थांतर्फे जिल्ह्यातील राम मंदिर तसेच हनुमान आदी देवी-देवतांची मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई केली हाेती. भगव्या पताकां, सडा-रांगोळ्यानी सजली हाेती. अनेकांनी महाआरती, महाप्रसाद, भजन-कीर्तन यांचे आयोजन तर राम-सीता वेशभूषा, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन केले हाेते. घराघरात दिवे-पणत्या, आकाश कंदील, रांगोळी, गोडधोड जेवण करून दीपावली सणा सारखा हा दिन साजरा करण्यात आला.  याच अनुषंगाने खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मतदारसंघातील गावोगावी  २२ जानेवारीला लाडू बनवण्याच्या उद्देशाने साखर-डाळ शिदा वाटप केला हाेता. घराघरात या शिद्यातून बनवलेल्या लाडवातून दोन लाडू परिसरातील श्रीराम, हनुमान मंदिरात प्रसाद म्हणून मूर्तिपूढे ठेवण्यात आले हाेते. या एकूण उपक्रमासाठी साखर शिदा वाटपापासून ते २२ जानेवारीला ठिकठिकाणच्या मंदिरात उत्सव साजरा करत श्रीरामाच्या लाडू नैवेद्य कार्यक्रमासाठी खासदार सुजय विखे यांचे कार्यकर्ते-यंत्रणेने जिल्हाभर काम केले. 

हे देखील वाचा : मराठा पदयात्रा; लढेंगे और जितेंगें, हम सब जरांगे’, जोरदार घोषणाबाजीत मराठ्यांचं वादळ नगरमधून मुंबईकडे रवाना

४०० पेक्षा अधिक गावांत मोफत साखर-डाळ वाटप (Shri Ram Temple)

जिल्ह्यात विशेषतः खासदार विखे यांच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक गावांत मोफत साखर-डाळ वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले हाेते. प्रत्येक कार्यक्रमाला स्वतः खासदार विखे यांची आवर्जून उपस्थिती राहिली आहे. त्यांनी या कार्यक्रमातून साखर-शिदा वाटपाचा उद्देश सांगताना २२ जानेवारीला न चुकता दिलेल्या शिद्यातून बनवलेले दोन लाडू जवळच्या श्रीराम अथवा हनुमान आदी मंदिरात नैवेद्य स्वरूपात ठेवण्याचे आवर्जून आवाहन केले हाेते. त्यानुसार नागरिकांनी आपल्या नजीकच्या मंदिरात लाडूचा नैवेद्य अर्पण केला आहे.

अवश्य वाचा: आता माघार नाही, आरक्षण घेऊनच मागे परतणार : मनोज जरांगे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here