Shri Ram Temple : संगमनेर शहरासह तालुका झाला श्रीराममय

Shri Ram Temple : संगमनेर शहरासह तालुका झाला श्रीराममय

0
Shri Ram Temple
Shri Ram Temple

Shri Ram Temple : संगमनेर : अयोध्यातील (Ayodhya) भव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण संगमनेर तालुक्यात आसमंत श्रीराममय झालेले पाहायला मिळाले. महाआरती, रथयात्रा, यज्ञ, गीतरामायनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिर (Shri Ram Temple) उभारणीचा आनंद दिवाळी (Diwali) प्रमाणे साजरा करण्यात आला. संगमनेरकरांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. संगमनेर शहरासह संपूर्ण तालुका तालुक्यातला परिसर श्रीराममय झाला. दुकानांच्या प्रवेशद्वारावर श्रीरामाचे आणि श्रीराम मंदिराचे फलक, आकाशकंदील लावण्यात आले होते.

नक्की वाचा : छाताडावर गोळ्या झाडल्या तरी आता एक इंच मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील

राम कथेवर आधारित विविध कार्यक्रम (Shri Ram Temple)

श्रीरामाच्या जय घोषाचे झेंडे, पताका लावून रस्ते ही सजवण्यात आले आहे. ठीकठिकाणी राम कथेवर आधारित विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. गृहसंकुलातील श्रीरामाचा जागर सुरू झाल्याचे चित्र दिसले. श्रीरामांची तीस फूट उंचीची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती. श्रीराम मंदिराच्या प्रतिमा असलेल्या टी-शर्ट, साड्या, टोप्या, शाली, प्रत्येकाकडे दिसू लागले होते. मिठाईच्या दुकानांमध्ये रामनामाचे केशर पेढे दाखल झाले होते. अनेक ठिकाणी लाडूचे पाकीट वाटण्यात आले होते. प्रत्येक घरावरती तसेच महत्त्वाच्या ठिकाणांवर शहरांमध्ये विविध ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ठीकठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली होती आणि हे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत होती. शहरातील चंद्रशेखर चौकातील राम मंदिरात सोमवारी सकाळपासून दिवसभर विविध रामभक्तीपर आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट लाईव्ह प्रक्षेपण मोठया स्क्रिनवर मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले होते. त्यामुळे तेथे जमलेल्या प्रत्येकाला अयोध्येत होत असलेल्या श्रीराम प्रतिष्ठापना होताना मोठ्या स्क्रिनवर पाहायला मिळाले.

Shri Ram Temple
Shri Ram Temple

हे देखील वाचा : मराठा पदयात्रा; लढेंगे और जितेंगें, हम सब जरांगे’, जोरदार घोषणाबाजीत मराठ्यांचं वादळ नगरमधून मुंबईकडे रवाना

घरोघरी प्रसाद पोहच (Shri Ram Temple)

सकाळी 7 वाजता श्रीरामरक्षा आणि हनुमान चालीसाचे सामुदायिक पठाणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर संगमनेर बसस्थानकावर दत्त मंदिर परिसरात खिचडी वाटप सुरू होते, तर शहरातील विविध चौकामध्ये लाडू वाटप करण्यात आले होते. घरोघरी प्रसाद पोहच करण्यात आला.  शहरात ठीकठिकाणी स्टेज उभारण्यात आले. श्रीरामांची व अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. अगदी गृहनिर्माण प्रकल्पांच्या सोसायटीच्या स्तरापासून सार्वजनिक मंडळे, धार्मिक संस्था, सामाजिक संस्था यांच्यातर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बच्चे कंपनी पासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. श्रीराम मंदिरासह इतर सर्व मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्याप्रमाणे कार्यक्रमही आयोजित केलेल्या ठिकाणावर कट आउट बॅनर उभारत सोहळ्याची रंगत वाढवली जात होती. विविध देवस्थानांवर भगवे ध्वज लावण्यात आले होते, देवस्थान तर्फे मंदिरासह परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. राम लल्लांचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येत होते. याशिवाय घरात मोठ्या संख्येने भगवे ध्वज लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण शहर भगवे होऊन राममय पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here