Rahmanullah Gurbaz Video: अफगाणिस्तानचा खेळाडू गुरबाजने गरजूंना वाटले पैसे

अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमान उल्ला गुरबाज दिवाळीच्या प्रसंगी रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरीबांना मदत करताना दिसत आहे.

0

नगर : विश्वचषक २०२३ मध्ये अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकलेला नाही. मात्र अनेक मोठ्या संघांना पराभूत करून त्यांनी क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्ताच्या एका खेळाडूचा एक  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमान उल्ला गुरबाज (Rahmanullah Gurbaz) दिवाळीच्या प्रसंगी रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरीबांना मदत (Help the poor) करताना दिसत आहे.

नक्की पहा : राज्यात पुढील २४ तासाचा पावसाची शक्यता 

गुरबाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूचे कौतुक करत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये गुरबाज रात्री रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरिबांजवळ पैसे ठेवताना दिसत आहे. गाढ झोपलेल्या गरीब लोकांच्या शेजारी पाचशेच्या नोटा ठेवल्या आहेत. जागे झालेल्या महिलेच्या हातात त्याने पैसे दिले आणि नंतर शांतपणे गाडीतून निघून गेला.

अवश्य वाचा :  मानसी नाईकची ‘लावा फोन चार्जिंगला’ लावणी  प्रेक्षकांच्या भेटीला

व्हिडीओमध्ये अहमदाबादच्या एका रेडिओ जॉकीचा आवाजही ऐकू येतो, ज्यामध्ये तो गुरबाजच्या या कामाचे कौतुक करत आहे. अफगाणिस्तानच्या लोकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये भारताबद्दल खूप प्रेम आहे. यामुळेच अफगाणिस्तानच्या चाहत्यांना त्यांच्या संघानंतर भारतीय संघ सर्वाधिक आवडतो. सध्या वर्ल्डकपच्या सामन्यात सुद्धा अफगाणिस्तानचे अनेक चाहते २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पाठिंबा देताना दिसत आहेत.

गुरबाजचे भारतातही खूप चाहते आहेत. अफगाणिस्तानचा सर्वात लोकप्रिय खेळाडू राशिद खान व्यतिरिक्त, रहमानउल्ला गुरबाज देखील दरवर्षी किमान दोन महिने तरी भारतात राहतो.  तो आयपीएलमधील महत्त्वाचा खेळाडू असून गुजरात टायटन्ससाठीही तो क्रिकेट खेळला आहे.