Ration card : शिधापत्रिका हाेणार इतिहास जमा; शासन देणार आता ई-शिधापत्रिका

Ration card : शिधापत्रिका हाेणार इतिहास जमा; शासन देणार आता ई-शिधापत्रिका

0
Ration card : शिधापत्रिका हाेणार इतिहास जमा; शासन देणार आता ई-शिधापत्रिका
Ration card : शिधापत्रिका हाेणार इतिहास जमा; शासन देणार आता ई-शिधापत्रिका

Ration card : नगर : शिधापत्रिकांऐवजी ई-शिधापत्रिका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासकीय कागदपत्रात महत्त्वाची बाब म्हणून शिधापत्रिकेची (Ration card) ओळख आहे. पिढ्यांपिढ्या जीवापाड जपली जाणारी शिधापत्रिका इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. राज्य शासनानाच्या (State Govt) निर्णयानुसार ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत. त्यांना ई-शिधापत्रिका (E-ration card) करून घेता येणार आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने आवश्‍यक कागदपत्रे अपलोड केल्यावर संबंधित तहसीलदार, पुरवठा निरीक्षकांमार्फत कागदपत्रांची पडताळणी करीत ई-शिधापत्रिका मंजूर होणार आहेत.

नक्की वाचा : नगर ते खरवंडी कासार रस्त्यासाठी १६ काेटीचा निधी मंजूर : सुजय विखे पाटील

ई-शिधापत्रिकासाठी जे नागरिक संगणक साक्षर नाहीत किंवा ज्यांना मोबाईल ॲपमध्ये कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य नाही, अशा नागरिकांना सेतू, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रात जाऊन ई-शिधापत्रिकेसाठी कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत. यासंदर्भात लवकरच सेतू, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र चालकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिली.

नक्की वाचा : गोवंश रक्षकांवर जमावाचा गोळीबार

स्वस्त धान्य योजनेतील लाभार्थ्यांना धान्य पुरवठा करण्यासाठी शिधापत्रिका तयार करण्यात आली. एका कुटुंबासाठी एक शिधापत्रिका दिली जाते. शिधापत्रिकेत नमूद लहान व्यक्तींच्या प्रमाणात स्वस्त धान्य योजनेतून नियतन दिले जाते. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अंत्योदय प्राधान्य कुटुंब आणि प्राधान्यक्रम योजनेद्वारे दर महिन्याला मोठ्या प्रमाणात धान्य वितरण केले जाते. गरजू लाभार्थ्यांच्या या स्वस्त धान्य योजनेस लोभाची कीड लागून काळाबाजार होण्याच्या घटना समोर आल्या. त्यास पायबंद घालण्यासाठी शिधापत्रिकांना बारा अंकी क्रमांक देण्यास सुरूवात करण्यात आली. बारा अंकी क्रमांकासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि हाताचे ठसे घेण्यात आले. पुरवठा विभागाच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पाडली गेली. पॉस मशिनवर धान्य वितरण केले जाऊ लागले. पात्र शिधापत्रिकांधारकांसोबतच राज्य शासनाकडून उत्तरदायित्व म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठीही धान्य देण्याची योजना राबविली जाते. तसेच सध्याच्या शिंदे-फडणवीस-पवार महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून विविध सण, उत्सव काळात नाममात्र दरात आनंदाचा शिधा दिला जात आहे. शासनाच्या ई-शिधापत्रिका धाेरणामुळे नागरिकांच्या वेळ, पैश्याची बचत हाेणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here