Samarpan Chaturmas : समर्पण चातुर्मास निमित्त प्रविणऋषीजी म.सा. यांचा मंगल प्रवेश उत्साहात

आचार्यश्रींच्या पुण्य भूमीत भाविकांचा अपूर्व उत्साह आनंददायी : पूज्य प्रविणऋषीजी महाराज

0
Samarpan Chaturmas : समर्पण चातुर्मास निमित्त प्रविणऋषीजी म.सा. यांचा मंगल प्रवेश उत्साहात
Samarpan Chaturmas : समर्पण चातुर्मास निमित्त प्रविणऋषीजी म.सा. यांचा मंगल प्रवेश उत्साहात

Samarpan Chaturmas : नगर : जैन धर्मातील अतिशय पवित्र असा समर्पण चातुर्मासानिमित्त उपाध्याय प्रवर पूज्य प्रविणऋषीजी म.सा. (Shri Praveenrishiji Maharaj Sahab) यांचा रविवारी (ता. २६) सकाळी आनंदधामच्या प्रांगणात मंगल प्रवेश झाला. विनायक नगर, बोरा फार्म येथून आनंदधामपर्यंत ऐतिहासिक असा मंगल प्रवेश सोहळा (Mangal Pravesh Sohala) झाला. भाविकांच्या अलोट गर्दीत झालेल्या या मंगल प्रवेशाने चातुर्मास (Samarpan Chaturmas) काळातील धर्म जागरणाचा शंख निनादला.

नक्की वाचा : भगवानगडावर आषाढी एकादशीला भक्तांचा महासागर; विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी पहाटेपासून रांगा

‘आनंद तीर्थ समवसरण’ येथे उपाध्यायश्रींचे आगमन

पूज्य प्रविणऋषीजी महाराज यांच्या नगरमधील समर्पण चातुर्मासाने महाराष्ट्रासह देशभरातील जैन समाजाचे लक्ष वेधले गेले आहे. उपाध्यायश्रींच्या मंगल प्रवेशाच्या शोभा यात्रेत अर्हम विज्जा परिवाराच्या १००८ कलशधारी महिला, आगम मंडळाच्या १००८ महिला, विविध युवक मंडळे, युवती मंडळे, महिला मंडळे, अग्रभागी जैन ध्वज घेतलेली मुले‌ तसेच हजारो भाविक सहभागी झाले होते. अर्हम विज्जा परिवाराच्या प्रशिक्षकांमार्फत चातुर्मासाच्या चार महिन्यांत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध आध्यात्मिक, सांस्कृतिक, संस्कारवर्धक व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांची माहिती देणारे आकर्षक देखावे , भगवान महावीर, आचार्यश्रींच्या प्रतिमा असलेली सजवलेली वाहने‌ शोभायात्रेचे आकर्षण ठरली. संपूर्ण शोभायात्रा मार्गावर दुतर्फा जैन ध्वजाची झालररूपी सजावट करण्यात आली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या मंगल प्रवेशाचा आनंद ओसंडून वाहत होता.शोभायात्रेद्वारे आनंदधाम येथे उभारण्यात आलेल्या ‘आनंद तीर्थ समवसरण’ येथे उपाध्यायश्रींचे आगमन झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कमिटीच्या वतीने सहकार्य करण्याचे आवाहन (Samarpan Chaturmas)

स्वागत शोभायात्रेसाठी सकल राजस्थानी युवा मंच एवम महिला मंच, सकल राजस्थानी रायझिंग युथ एवम युवती मंच, जय आनंद महावीर युवक मंडळ, जय आनंद फाऊंडेशन, श्री बडीसाजन ओसवाल युवक संघ यांनी नियोजन व्यवस्था पाहिली. प्रारंभी अशोक (बाबूशेठ) बोरा यांनी स्वागत करताना सांगितले की, सर्वांसाठी बहुप्रतीक्षित असा उपाध्यायश्रींचा मंगल प्रवेश झाला. हा ऐतिहासिक क्षण असून तब्बल १७ वर्षांनंतर उपाध्यायश्री आपल्या गुरूदेवांच्या पुण्य भूमीत चातुर्मासासाठी विराजमान झाले आहेत. येत्या चार महिन्यांच्या चातुर्मास काळात तन, मन आणि श्रद्धेने विविध धार्मिक, आध्यात्मिक व संस्कारमय उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सर्वांनी धर्मलाभ घ्यावा, तसेच या चातुर्मासाला अभूतपूर्व असे शिखर स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले. कमिटीचे महामंत्री आदेश चंगेडिया यांनी चातुर्मासासाठी करण्यात आलेल्या नियोजन व्यवस्थेची माहिती दिली.

संग्राम जगताप म्हणाले की

सपना कटारिया यांनी मनोगतात सांगितले की, तब्बल १७ वर्षांपासून नगरकर भाविक ज्या क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, तो क्षण आज आला आहे. उपाध्यायश्रीजींचा चातुर्मास प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, अहिल्यानगर शहरासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. आचार्यश्रींच्या पावन भूमीत उपाध्यायश्रींच्या मार्गदर्शनात खऱ्या अर्थाने धर्म जागरण सुरू झाले आहे. आगामी चार महिने सर्वांसाठी मोठी धार्मिक पर्वणी आहे. जीवनाला दिशा देणाऱ्या या सुंदर पर्व काळात प्रत्येकाने सहभागी होऊन सर्व कार्यक्रमांचा आवर्जून लाभ घ्यावा. विद्याधर काकडे म्हणाले, समर्पण चातुर्मासामुळे संपूर्ण नगर शहरात उत्साहाचे वातावरण आहे. साधूसंतांच्या चरण स्पर्श झाल्याने ही भूमी आणखी पवित्र बनली आहे. हा संपूर्ण चातुर्मास भाविकांसाठी पर्वणी ठरणार आहे.पूज्य प्रविणऋषीजी महाराज यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आचार्यश्रींच्या पुण्यभूमीत समर्पण चातुर्मासासाठी येणे ही गुरूदेवांचीच कृपा आहे.

भाविकांचा अपूर्व उत्साह

१७ वर्षांनी आपल्या घरी आलेल्या व्यक्तीला जसे वाटते तशा भावना माझ्या मनात आहेत. मी आज जो काही आहे तो गुरू कृपेमुळे. गुरूदेवांनी माझ्या जीवनाला आकार दिला. त्यांच्या पुण्यभूमीतील भाविकांचा अपूर्व उत्साह पहायला मिळतो. गुरूदेवांच्या शिष्याचा चातुर्मास व्हावा ही पूज्य प्रवर्तकश्रीजी यांचीही इच्छा होती. गुरूबंधूंच्या सान्निध्यात चातुर्मास होत आहे. या चातुर्मासासाठी सौरभ बोरा यांनी सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी आग्रहपूर्वक घेतली. त्यांनी व चातुर्मास कमिटीने सर्व नियोजन अतिशय सुंदर केले आहे. येथील सभामंडपात प्रवेश केल्याबरोबर खूप प्रसन्न वाटले. समर्पण चातुर्मास कमिटीचे महामंत्री आदेश चंगेडिया यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सभा मंडपाची उभारणी केली आहे. संपूर्ण सोहळ्याला अनुरूप अशा सजावटीने येथील वातावरण खूप सकारात्मक झाले आहे. ही सुद्धा गुरूदेवांचीच कृपा आहे. नगर शहर आणि उपनगरातील संपूर्ण सकल संघाने यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

चातुर्मास स्थळी या पुण्यतिथीचा कार्यक्रम होणार

पुढच्या दोन दिवसातील प्रवचनात चातुर्मास का आणि कसा करायचा याबाबत मार्गदर्शन करणार आहे. चातुर्मास योग्य पद्धतीने केला तर नरक गतीचे दरवाजे आपल्यासाठी बंद होतात. जिनशासनात याला खूप महत्त्व आहे. ३१ जुलै रोजी दुज तिथी आहे. गुरूदेवांचे गुरूदेव पूज्य तिलोकऋषीजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या प्रती संपूर्ण दक्षिण भारताने कृतज्ञ राहिले पाहिजे. चातुर्मास स्थळी या पुण्यतिथीचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात प्रारंभी अर्हम विज्जा ग्रुपच्या महिलांनी स्वागत गीत सादर केले. तीर्थ भक्ती ग्रुपने गुरूवंदना सादर केली. अर्हम विज्जा आनंदतीर्थ जिनेश्वरी गुरूभक्ती सादर केली. आभार सचिन देसरडा यांनी मानले. मंगल पाठ आणि गुरू वंदना होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.मंगल प्रवेशापूर्वी बोरा फार्म येथे उपाध्यायश्रीजींच्या सान्निध्यात भव्य सहजोडे भक्तामर अनुष्ठान झाले. यात तब्बल ३ हजार जोड्या सहभागी झाल्या होत्या.

भाविक मोठ्या संख्येने उपस्थित

यावेळी महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी म.सा., पूज्य आलोकऋषीजी म.सा., पूज्य तिर्थेशऋषीजी म.सा. , साध्वी पूज्य सत्यप्रभाजी म.सा., साध्वी पूज्य अमितज्योतीजी म.सा. आदींसह साधू साध्वीजी तसेच आमदार संग्राम जगताप, राष्ट्रीय पाठशाळेचे अध्यक्ष विद्याधर काकडे, माजी जि.प. सदस्य हर्षदा काकडे, नगरसेवक गणेश भोसले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, प्रकाश भागानगरे, मर्चंटस बॅंकेचे चेअरमन संजय चोपडा,

समर्पण चातुर्मासाचे मुख्य लाभार्थी अहिल्यानगरचे सुपुत्र, मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योगपती तसेच तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा, राखी सौरभ बोरा, प्रमिलाबाई बोरा, पराग बोरा व बोरा परिवार,समर्पण चातुर्मास आयोजन कमिटीचे अध्यक्ष अशोक (बाबूशेठ) बोरा, महामंत्री आदेश चंगेडिया, कार्याध्यक्ष राजेश भंडारी, कोषाध्यक्ष विलास कटारिया, उपाध्यक्ष अनिल पोखरणा, राजकुमार बोरा, विजय गुगळे, सुरेश कांकरिया, सचिन देसरडा, मनसुख गुंदेचा, सहसचिव अभय गांधी, अभिजीत गांधी, सहकोषाध्यक्ष विनोद कटारिया, कमिटीचे सर्व सदस्य, धनेश कोठारी, ईश्वर बोरा आदींसह देशभरातील जैन संघटनांचे पदाधिकारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.