Sangamner News : संगमनेर तालुका सहकारी दूध संघाला ई-मार्केट पुरस्कार

Sangamner News : संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनच्या ई-मार्केट पुरस्काराने गौरविण्यात आले.

0
Amit Shah

Sangamner News: संगमनेर : काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील ग्रामिण विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनच्या (National Cooperative Dairy Federation) ई-मार्केट पुरस्काराने (E-Market Awards) गौरविण्यात आले.

नक्की वाचा : दक्षिण आफ्रिका ५५ धावात गारद; सिराजचा भेदक मारा

गुजरातमधील गांधीनगर येथे नॅशनल को-ऑपरेटीव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी स्वीकारला. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. मिनेश शहा, राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. मंगल जीत राज्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

अवश्य वाचा : सत्तेच्या नादामुळे विचारधारेकडे दुर्लक्ष;जयंत पाटलांनी व्यक्त केली खंत

थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी दूध संघाची स्थापना केली आहे. त्यांच्या आदर्श विचारावर या संघाची वाटचाल चालू आहे. पारदर्शक व चांगल्या कामातून  राज्यात हा दूध संघ आदर्श ठरला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तालुक्यातील दुग्ध व्यवसायाला आधिक स्थिरता निर्माण करण्यासाठी दूध संघ कटीबध्द आहे. सहकारी दूध संघाच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जातो. त्या माध्यमातून तालुक्यात सुमारे ७ लाख लिटर दुधाची निर्मिती होत आहे. सहकाराच्या माध्यमातून समृध्दी निर्माण करणाऱ्या संगमनेर दूध संघाला राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

दूध संघास सलग दोन वर्षे हा पुरस्कार मिळाल्याबददल राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पा. खेमनर, माधवराव कानवडे,  दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, बाबा ओहोळ, सुधाकर जोशी, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात. शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, रामहारी कातोरे आदीसह विविध मान्यवरांनी कौतुक केले आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here