IND Vs SA : दक्षिण आफ्रिका ५५ धावात गारद; सिराजचा भेदक मारा   

IND Vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये यजमान आफ्रिकेचा संघ ५५ धावांवर ऑल आऊट झाला आहे. टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज याने सर्वाधिक सहा विकेट घेत अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडूंना बाद केलं आहे.

0
Mohmmad Siraj

IND Vs SA : नगर : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये (Second Test Match) यजमान आफ्रिकेचा संघ ५५ धावांवर ऑल आऊट (All Out) झाला आहे. टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने सर्वाधिक सहा विकेट घेत अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडूंना बाद केलं आहे. तर जसप्रीत बुमराहने (jasprit Bhumrah) दोन आणि मुकेश कुमारने (Mukesh Kumar) दोन विकेट घेतल्या. पहिलं सत्र संपण्याच्या आत टीम इंडियाने आफ्रिका संघाला ऑल आऊट केलं आहे. साऊथ आफ्रिका संघाचा टीम इंडिया विरुद्धचा हा इतिहासातील सर्वात कमी स्कोर ठरला आहे.

नक्की वाचा : सदाशिव लोखंडेंनी आखले नव्या राजकीय खेळीचे मनसुबे

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आज सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याने केपटाऊनच्या न्यूलँड्स  मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण एल्गरचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी हाणून पाडला. अगोदर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेला भारताने लागोपाठ धक्के दिले. अवघ्या १५ धावांत आफ्रिकेच्या आघाडीच्या फलंदाजांना त्यांनी तंबूत पाठवले आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने भेदक मारा करत आफ्रिकेला गारद केले आहे.

अवश्य वाचा : एसटी प्रशासनाविरोधात शिवसेना आक्रमक

सुरवातीला एल्गर आणि मार्करम फलंदाजीसाठी मैदानात आले. मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात एडन मार्करम याला तंबूचा रस्ता दाखवला. मार्करम याला फक्त दोन धावाच करता आल्या. सिराजच्या भेदक गोलंदाजी समोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. एडन मार्करमनंतर डीन एल्गर यालाही सिराजने तंबूचा रस्ता दाखवला. एल्गरनं पहिल्या कसोटी सामन्यात दीडशतकी खेळी केली होती. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पण दुसऱ्या कसोटीत एल्गरचा अडथळा सिराजने काढून टाकला. एल्गर फक्त चार धावा काढून तंबूत परतला.

दुसऱ्या कसोटीत खेळणारा ट्रिस्टन स्टब्स देखील अधिक वेळ खेळात टिकू शकला नाही.जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर स्टब्स देखील बाद झाला. त्याला फक्त ३ धावा करता आल्या. टोनी डे जोरजी यालाही तग धरता आला नाही. त्याला फक्त दोन धावा करता आल्या. सिराजने त्याला राहुलकरवी झेलबाद केले. डेव्हिड बेडिंगहॅम याने १२ धावा, काइल वेरेन (१५ धावा), मार्को जॅनसेन (०) यांना सिराजने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर मुकेश कुमार यानेही आपलं विकेटचं खातं उघडलं. मुकेशने केशव महाराज आणि कगिसो रबाडाला आऊट करत आफ्रिकेला ऑल आऊट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here