Shivsena : एसटी प्रशासनाविरोधात शिवसेना आक्रमक

Shivsena : माळीवाडा येथील बसस्थानकातील आरक्षण सुविधा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय असल्याने शिवसेनेने (ठाकरे गट) आक्रमक पवित्रा घेतला आहे.

0
Shivsena : एसटी प्रशासनाविरोधात शिवसेना आक्रमक
Shivsena : एसटी प्रशासनाविरोधात शिवसेना आक्रमक

Shivsena : नगर : एसटी (ST) महामंडळाच्या माळीवाडा येथील बसस्थानकातील आरक्षण (Reservation) सुविधा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय असल्याने शिवसेनेने (Shivsena) (ठाकरे गट) आक्रमक पवित्रा घेतला आहे. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने आज एसटीच्या विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.

हे देखील वाचा : सोमय्यांचा वातावरण निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न : जयंत पाटील

निवेदनात म्हटले आहे की, माळीवाडा बसस्थानकावर आजपर्यंत प्रवाशांना आगाऊ आरक्षण करण्यासाठी सोय होती. ही सेवा अचानक बंद करण्यात आली आहे. या संदर्भात आमच्याकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या. त्याची खातरजमा करण्यासाठी आमचे कार्यकर्ते माळीवाडा बसस्थानकावर जाऊन समक्ष विचारणा करून आले. त्यामुळे आमची खात्री झाली की माळीवाडा बसस्थानकावरील आगाऊ आरक्षणाची सुविधा विनाकारण बंद करण्यात आलेली आहे. नगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माळीवाडा बसस्थानकावर ही सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. तो नगरच्या नागरिकांचा हक्क आहे. एस. टी. ची सुरवात ज्या बसस्थानकापासून झाली, त्या बसस्थानकावर असलेली सुविधा काहीही कारण नसताना व अचानक बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. तरी वरील सुविधा त्वरित पूर्ववत करावी. अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

नक्की वाचा : पद्मशाली समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बिनविराेध निवड ; अध्यक्षपदी श्रीनिवास बाेज्जा, तर सचिवपदी अमित बुरा

निवेदन देताना भगवान फुलसौंदर, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम, उप जिल्हा प्रमुख दत्ता जाधव, युवा नेते विक्रम राठोड, अशोक दहिफळे, संतोष गेनाप्पा, स्मिता अष्टेकर, श्रीकांत चेमटे, सुरेश क्षीरसागर, प्रशांत गायकवाड, संदीप दातरंगे, अक्षय शेकडे, सचिन गोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here