Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप करणार उपोषण

नगर तालुका : शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरीच्या घटना (incidents of theft) मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापारी वर्ग भयभीत झाला आहे.

0
Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप करणार उपोषण
Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप करणार उपोषण

Sangram Jagtap : नगर तालुका : शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरीच्या घटना (incidents of theft) मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापारी वर्ग भयभीत झाला आहे. पोलीस (Police) तपासही वेळेवर होत नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत आहे. यातून बाजारपेठेत सातत्याने चोरीच्या घटना घडत आहे. या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून तपासाला गती द्यावी, अन्यथा २८ नोव्हेंबर रोजी दाळमंडईत उपोषण (hunger strike) करू असा इशारा आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदनातून दिला.


यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, अजिंक्य बोरकर आदींसह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्की वाचा : राज्यात आणखी ‘२०’ हजार शिक्षकांची भरती होणार


शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले आडते बाजार, डाळमंडई, एम.जी. रोड व त्या लगतचा सर्व परिसर या भागात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून पोलीस प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारचे उपाययोजना किंवा चोऱ्या कशा रोखता येतील याबाबत कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. ज्या चोऱ्या झाल्या आहेत त्याबाबतीतही आजपावेतो योग्य असा तपास होऊन आरोपी अटक झालेले नाहीत. दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रताप हर्दवाणी यांना मारहाण करून त्यांच्याकडील त्यांची पैश्याची बॅग हिसकावून घेऊन काही चोरटे पळून गेले होते. त्याबाबत त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून तसाच काहीसा प्रकार हा दिपक आहुजा यांच्या बाबतीत डाळमंडई परिसरात घडला होता. त्यात ही त्यांना मारहाण करुन त्यांच्याही पैश्याची बॅग हिसकावून चोरली होती. अशा चोरीच्या घटना सध्या बाजारपेठ परिसरात घडत आहेत. आजपर्यंत सदर चोरीचा उलगडा पोलीस प्रशासनाकडून झालेला नसून सदरचे आरोपी हे आजही मोकाट फिरत आहेत.

हे देखील वाचा : राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याची सुब्रमण्यम स्वामींची तक्रार; गृहमंत्र्यांना धाडले पत्र


तरी अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यापारी हे आज या वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे भयभीत झाले असून त्यांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास कमी होताना दिसत आहे. सदरच्या चोऱ्यांच्या प्रकारातून एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही काही महिन्यापूर्वी अहमदनगर शहरालगतच चोरीच्या घटनेतूनच खूनासारखी गंभीर घटना घडली होती. अशी एखादी घटना घडण्याची वेळ पुन्हा येऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाकडून काही तरी ठोस उपाययोजना करण्याची गरज असून बाजारपेठेतील चोऱ्यांच्या बाबतीत जर तपास लवकरात लवकर लागला नाही तर २८ नोव्हेंबर रोजी अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेत उपोषण करू असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here