Sharad Pawar : राहुरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दहा वर्षांपूर्वी जनतेला लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) जी आश्वासने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांची पूर्तता झालेली नाही . देशाच्या भल्यासाठी या सरकारने काहीच केलेले नाही. केवळ केंद्रीय सत्तेचा, यंत्रणांचा दुरुपयोग करीत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न संसदीय लोकशाहीत (Democracy) होत आहे. मात्र, या देशातील जनता यांच्या हुकूमशाही राजवटीचे सत्तेचे सिंहासन उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा: लोकसभेच्या निकालाचे अचूक भाकीत वर्तवा; २१ लाख रूपये जिंका – अंनिसचे आव्हान
नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरीमध्ये सभा (Sharad Pawar)
नगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरीत आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनताभिमुख कारभार केला. शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या क्षेत्रात चांगले काम केले. दिल्लीतील जनता त्यांच्यावर खूश आहे. त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली, म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्यात आले. झारखंड येथील आदिवासी मुख्यमंत्री यांनी केंद्राने मदत दिली नाही म्हणून पंतप्रधानांवर टीका केली. म्हणून त्यांना अटक करण्यात आली. सी बी, ईडी या केंद्रीय यंत्रणांचा उपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी होत आहे.
नक्की वाचा: ‘सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी अनेकदा कर्जमाफी करू’- राहुल गांधी
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती (Sharad Pawar)
पश्चिम बंगालमध्ये तीन मंत्री आज तुरुंगात आहेत. देशाची वाटचाल हुकूमशाही कडे चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी प्रास्ताविक केले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव, करणी सेनेचे अध्यक्ष नीलेश जाधव यांची यावेळी भाषणे झाली. व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुण कडू, सभापती अरुण साहेब तनपुरे, मच्छिंद्र सोनवणे, बाळासाहेब आढाव, संदीप वर्पे, रावसाहेब म्हस्के, धनराज गाडे, अमृत धुमाळ आदी उपस्थित होते.