Theft : तब्बल एक तपानंतर चोरीला गेलेले दागिने मिळाले; शिक्षिकेच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले

Theft : तब्बल एक तपानंतर चोरीला गेलेले दागिने मिळाले; शिक्षिकेच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले

0
Theft
Theft : तब्बल एक तपानंतर चोरीला गेलेले दागिने मिळाले; शिक्षिकेच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले

Theft : नगर : शहरात १२ वर्षांपूर्वी चोरीला (Theft) गेलेले दागिने कोतवाली पोलिसांनी (Police) निवृत्त शिक्षिकेला परत केले. दागिने मिळण्याची आशा सोडलेली असताना अचानक दागिने परत मिळाल्याने त्या निवृत्त शिक्षिकेला (Retired Teacher) आनंद गगनात मावेनासा झाला. सुनीता सोन्याबापू सोनवणे (रा. शाहूनगर, केडगाव, नगर) असे निवृत्त शिक्षिकेचे नाव आहे.

हे देखील वाचा: लोकसभेच्या निकालाचे अचूक भाकीत वर्तवा; २१ लाख रूपये जिंका – अंनिसचे आव्हान

२०१२ ला झाले होते चोरी

२६ जानेवारी २०१२ रोजी सुनीता सोनवणे या ध्वजवंदन कार्यक्रमासाठी सकाळी दुचाकीवरून नगरमधील १०८ महंत पंडित माध्यमिक विद्यालय, नुतन कन्या शाळा येथे जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरांनी सोनवणे यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मनी गंठण लंपास केले. या संदर्भात त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास लावत चोरांकडून मिनी गंठण हस्तगत केले.

नक्की वाचा: ‘सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी अनेकदा कर्जमाफी करू’- राहुल गांधी

संपर्क न झाल्याने विलंब (Theft)

दरम्यान, सोनवणे यांचा मोबाईल नंबर व घराचा पत्ता बदलल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांना दागिने मिळू शकले नाहीत. पोलिसांनी सोन्याचे दागिने परत नेण्याबाबत प्रसिद्धी पत्रक काढल्यावर सुनीता सोनवणे यांनी संपर्क केला. एक तपानंतर दागिने परत मिळाल्याने निवृत्त शिक्षिकेच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्यांना हे दागिने कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here