Shri Ram Temple : प्रभू श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठापना सोहळा पाहणे जीवनाचे भाग्य : नरेंद्र फिरोदिया 

Shri Ram Temple : प्रभू श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठापना सोहळा पाहणे जीवनाचे भाग्य : नरेंद्र फिरोदिया 

0
Shri Ram Temple
Shri Ram Temple

Shri Ram Temple : नगर तालुका : प्रभू श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठापना सोहळा पाहणे जीवनाचे भाग्य आहे. या सोहळ्यामुळे आपला संपूर्ण देश राममय झाला आहे, असे प्रतिपादन आय लव्ह नगरचे संस्थापक तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी केले. अयोध्या (Ayodhya) येथील राम मंदिरात (Shri Ram Temple) झालेल्या प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मार्केट यार्ड येथे महावीर चषक परिवाराच्या वतीने हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते.  

हे देखील वाचा : मराठा पदयात्रा; लढेंगे और जितेंगें, हम सब जरांगे’, जोरदार घोषणाबाजीत मराठ्यांचं वादळ नगरमधून मुंबईकडे रवाना

मंदिरात फुलांची आकर्षक सजावट (Shri Ram Temple)

अयोध्या येथील राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जय राम जय जय रामच्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणला होता. भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी महावीर चषकचे पदाधिकारी, व्यापारी वर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच प्रभू श्रीरामाची वेशभूषा केलेल्या लहान बालकांची शोभायात्रा काढून पुष्प फुलांचा वर्षाव करण्यात आला. 

Shri Ram Temple
Shri Ram Temple

नक्की वाचा : छाताडावर गोळ्या झाडल्या तरी आता एक इंच मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील

यांची उपस्थिती (Shri Ram Temple)

यावेळी संजय चोपडा, राजेंद्र गांधी, किशोर पितळे, संजय लुणिया, नवनीत चंगेडिया, दीपक बोथरा, अनिल लुंकड, अशोक मुनोत, प्रमोद डागा, संदेश मुनोत, जवाहर गांधी, धनेश कोठारी, दायमा महाराज, बाळू बोथरा, राजू पटवा, सचिन भंडारी, सागर देसरडा, राजेश गुगळे, किशोर पोखरणा, प्रशांत डागा, अमित गांधी, रुपेश कटारिया, उमेश मंत्री, निखिल गुगळे, प्रवीण शिंगवी, प्रफुल मुथा, अजय गुगळे, अमोल पोखरणा, अभी कोके, वर्धमान मुनोत, मयूर पितळे, विकास सुराणा, विवेक डफळ, आनंद गांधी, प्रीतम पोखरणा, सागर बोरा, पारस शेटिया, प्रीतम गुंदेचा, अतुल शेटिया, जितू पोखरणा, सुयोग लुनिया, रुपेश भंडारी, प्रतीक भंडारी, राजेंद्र गांधी, राजेंद्र ताथेड, आनंद नहाटा, अजय कांबळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here