Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मराठी भाषा गौरव दिवसाची पोस्ट चर्चेत

आज मराठी भाषा गौरव दिन आहे. त्यानिमित्ताने सोनाली कुलकर्णीने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. सोनाली कुलकर्णीने या पोस्टमध्ये स्वत:चे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

0
Sonali Kulkarni
Sonali Kulkarni

नगर : मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही सोशल मीडियावर  नवनवीन फोटोशूट, नवीन प्रोजेक्ट, आयुष्यातील नव्या घडामोडी यांची सर्व माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. आज मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) आहे. त्यानिमित्ताने सोनाली कुलकर्णीने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. सोनाली कुलकर्णीने या पोस्टमध्ये स्वत:चे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नक्की वाचा : मुख्यमंत्री साहेब! ही धमकी आहे का? उद्या जर जरांगे पाटलांचा जीव गेला, तर मुख्यमंत्री जबाबदार असणार का? काँग्रेस पक्षाचे ट्विट चर्चेत

सोनाली कुलकर्णीने गळ्यामध्ये घातलेल्या नेकलेसची चर्चा (Sonalee Kulkarni)

सोनाल कुलकर्णीने नुकताच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने लाल काठ असलेली केशरी रंगाची साडी नेसली आहे. सोनाली कुलकर्णीने गळ्यामध्ये घातलेल्या युनिक नेकलेसचीच चर्चा होत आहे. तिने गळ्यामध्ये घातलेल्या नेकलेसवर बाराखडी लिहिली आहे. सोनालीने या साडीवर लाईट मेकअप, मोकळे केस आणि कपाळावर चंद्रकोर लावून आपला लूक परिपू्र्ण केला आहे. सोनालीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये , ‘बाराखडी गिरवताना कुठे माहीत होतं? पुढे, हाती खजीना लागणारे! #मै. @maithilyapte मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. असे लिहिले आहे.

अवश्य वाचा : मनोज जरांगेंची एसआयटी चौकशी होणार; नार्वेकरांचे आदेश

सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत  (Sonalee Kulkarni)

सोनाली कुलकर्णीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी पसंती देत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. त्याचसोबत या पोस्टला सुंदर कॅप्शन दिल्याचे देखील तिच्या चाहत्यांनी म्हटलं आहे. या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. सोनाली कुलकर्णीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, सोनाली कुलकर्णीचा ‘मलाइकोट्टई वालीबान’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. लवकरच ती ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात म्हणजे २२ मार्चला रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here