ST : खूशखबर; ‘लालपरी’ची अखेर नफ्याकडे वाटचाल 

ST : खूशखबर; 'लालपरी'ची अखेर नफ्याकडे वाटचाल 

0

ST : नगर : सातत्याने आर्थिक ताेट्यात असणारी एसटी (ST) अर्थात लालपरीची अखेर नफ्याकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांत दिसत आहे. शासनाने राबवल्याने विविध याेजनांमुळे प्रवासी संख्या वाढत आहे. त्यामुळे एसटीच्या महसुलातही वाढ (Increase in revenue) हाेत आहे. एसटीचे सरासरी वार्षिक उत्पन्न (Annual income) ६७ कोटी आहे. कोरोनाकाळात एसटीचा संचित तोटा १२ हजार कोटी होता. त्यात घट होऊन संचित तोटा नऊ हजार कोटींवर आला आहे. तब्बल १० वर्षांनी एसटीचा नफा नोव्हेंबर महिन्यात १७ कोटी रुपयांचा झाला आहे.

नक्की वाचा : डॉक्टरांची मोलकरीणच घरफोडीची मास्टरमाईंड


एसटी बस ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावाचे दळणवळणाचे मुख्य साधन आहे. राज्य सरकारने राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याने एसटीची आर्थिक चाके वेगाने फिरू लागली आहे. अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास आणि सर्व महिलांना ५० टक्के प्रवासी तिकिटात सवलत या दोन योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवाळीमध्ये एसटी महामंडळाने १० टक्के हंगामी भाडेवाढ केली होती. तीही एसटीच्या फायद्याची ठरली आहे.

हे देखील वाचा : नगरच्या माेडी लिपी तज्ज्ञांनी शाेधली मनाेज जरांगेंची कुणबी नाेंद 

२०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत महामंडळाच्या सवलत मूल्यासहित एकूण उत्पन्न सुमारे सहा हजार ४४७ कोटी ५७ लाख होते. त्यात सवलत मूल्याचे दोन हजार १८२ कोटी ८० लाख रुपये राज्य सरकारने एसटी महामंडळाला अदा केले. २३७ कोटी २६ लाखांचे अनुदान सरकारने दिले आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत महामंडळाचा एकूण खर्च सहा हजार ९४१ कोटी ४५ लाख असून एकूण तूट ७१७ कोटी ३७ लाख आहे. या व्यतिरिक्त एसटीचे सरासरी वार्षिक उत्पन्न ६७ कोटी आहे. कोरोनाकाळात एसटीचा संचित तोटा १२ हजार कोटी होता. त्यात घट होऊन संचित तोटा नऊ हजार कोटींवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here