Anganwadi workers strike:अंगणवाडी सेविका-मदतनीस आंदोलनाला ‘स्वराज्य’ चा पाठिंबा

अंगणवाडी सेविका ,मदतनीस यांचा प्रश्न तात्काळ सोडवून शासनाने योग्य भूमिका घेऊन त्यांना न्याय द्यावा, यासाठी स्वराज्य पक्षाने या आंदोलनात उडी घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

0
Anganwadi workers

Anganwadi workers strike: संगमनेर : नगर जिल्हा अंगणवाडी सेविका (Anganwadi worker) मदतनीस कर्मचारी युनियनने सोमवारी (ता.८) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संप (Statewide strike) पुकारला. या संपाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याच्या दिलेल्या बेकायदेशीर नोटिसा मागे घ्या, या मागणीसाठी नगरच्या जिल्हा परिषदेत (Nagar Zilla Parishad) व्य मोर्चा (Strike) काढण्यात आला होता. 

नक्की वाचा : डॉक्टरांची मोलकरीणच घरफोडीची मास्टरमाईंड

अंगणवाडी सेविका ,मदतनीस यांचा प्रश्न तात्काळ सोडवून शासनाने योग्य भूमिका घेऊन त्यांना न्याय द्यावा, यासाठी स्वराज्य पक्षाने या आंदोलनात उडी घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी बोलत असताना स्वराज्य पक्षाचे इंजिनिअर आशिष कानवडे यांनी सरकारवर तोफ डागत कडक भाषेत टीका केली. सरकारच कुठलं ही काम असो पहिली आठवण होते ती सेविका मदतनीसांची. कोरोना काळात जगाला आदर्श अस काम महाराष्ट्र राज्यातील सेविका मदतनीस आशा सेविकांनी केले आहे. मात्र आता त्यांना देण्याची वेळ आली तर सरकार वेळकाढूपणा करत आहे.

अवश्य वाचा : आदिवासी मंडळाच्या कार्यालयात ओतला हिरडा

कानवडे पुढे म्हणाले की, स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे आपल्या सोबत आहेत. राज्य सरकारकडे आपली व्यथा मांडण्यासाठी लवकरच कर्मचारी व स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांची बैठक लावून मागण्या मान्य करण्यासाठी स्वराज्य कटिबद्ध राहील असे त्यांनी सांगितले आहे.

निलेश पवार यांनी सर्व आंदोलनकर्त्याना आश्वासीत केले की, तातडीने बैठक होऊन सरकार दरबारी तुमच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी स्वराज्य प्रयत्नशील आहे. यावेळी सुरेश कालडा, साईनाथ बोराटे,दीपक चांदणे,साहिल गडाख,आकाश चतुर्भुज,विनोद कोकणे,सचिन कानवडे,राहुल कानवडे,ओंकार डोंगरे, आदित्य बढे आदींसह आंदोलनकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here