ST Bus : नगर : एसटी बस (ST Bus) मधील वाहक हेच महामंडळ आणि जनता यांमधील दुवा म्हणून काम करत असतात. बसमध्ये तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांसमोर वाहकाची (carrier) नाचक्की करून त्याची झडती घेण्याच्या आणि त्याचे खिसे तपासणे या प्रकारामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण हाेत आहे. तसेच वाहकांवर अविश्वास दाखवणे आणि त्यांना प्रवाशांसमोर (Passenger) अपमानित करणे हा प्रकार सर्वस्वी निंदनीय आहे, अशा तपासण्यांमुळे वाहकांची माझी एसटी म्हणून काम करण्याची भावना संपेल, अशी भीतीही महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष (उद्धव ठाकरे गट) शिवनाथ खाडे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपले आदेश त्वरित रद्द करावेत आणि कर्मचाऱयांमधील असंतोष कमी करावा, अशी विनंती खाडे यांनी एसटी महामंडळाला केली आहे.
हे देखील वाचा: माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरण सिंह व डॉ. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर
एका वाहकाकडून बनावट बिलाद्वारे अपहार (ST Bus)
खाडे म्हणाले, ”सांगली विभागातील इस्लामपूर आगारातील एका वाहकाने मोबाईल प्रिंटर आणि त्यामध्ये महामंडळाचे तिकीट रोल टाकून मोबाईल अॅपद्वारे बनावट तिकीट प्रवाशांना देऊन अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याचे एसटी महामंडळाच्या एका पत्रकात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत राज्यभरातील सर्व वाहकांचे इटीआय मशिन, मोबाईल, अॅप, त्यांची बॅग, लॉकर आणि खिसे तपासून त्याचे व्हिडियो चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नक्की वाचा: एकनाथ शिंदे सरकारी पैशाने गुंडांना पोसतात : संजय राऊत
एसटी वाहकांची बदनामी (ST Bus)
मात्र, यातून एसटी वाहकांची बदनामी होत असून जनमानसामध्ये प्रतिमा मलिन होऊ शकते. त्यामुळे संबंधित आदेश तत्काळ रद्द करावे. राज्यभरातील वाहक हे जणू काही केवळ चोरी करण्याचे काम करत आहेत, असा विचार करूनच हे आदेश दिल्याचे दिसून येते. तपासणीदरम्यानच्या कार्यपद्धतीमध्ये मानवी मूल्यांचे उल्लंघन आणि संविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराचा बिनदिक्कतपणे भंग करण्यात आल्याचे खाडे म्हणाले.”