नगर : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha election) राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. कारण अजित पवार गट (Ajit Pawar Gat) हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने (EC) मंगळवारी (ता.६) केली. निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ दिले आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पक्ष राहिला नसून नव्या पक्षाच्या स्थापनेसाठी त्यांना आज ४ नावे निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहेत.
नक्की वाचा : अखेर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध
शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या चिन्हांची नावे आली समोर (Sharad Pawar)
आयोगाने शरद पवार यांना सांगितले आहे की, ते त्यांचा नवा पक्ष स्थापन करण्यासाठी आयोगाला कोणतीही ४ नावे देऊ शकतात. त्यासाठी आयोगाने शरद पवार गटाला आज (ता.७) दुपारी चार वाजेपर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या चिन्हांची नाव समोर आली आहेत. शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि शरद स्वाभिमानी पक्ष अशी पक्षाची नावे तर कपबशी, सूर्यफूल, चष्मा आणि उगवता सूर्य अशी चिन्हांची नावे आहेत.
अवश्य वाचा : ‘केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार आल्यास आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल’- राहुल गांधी
अजित पवारांच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना (Sharad Pawar)
दरम्यान पक्ष-चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.आपल्याला जनमताच्या आधारावर पक्ष-चिन्ह मिळाल, त्याचा मान राखा, असे अजित पवार म्हणाले. जाहीरपणे बोलताना वाद होईल,अशी वक्तव्ये टाळा, पक्ष-चिन्ह मिळाल्याचा आनंद असला तरी उन्माद होऊ देऊ नका. यापुढे अधिकाधिक लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील, यासाठी जोमाने कामाला लागा,असं त्यांनी सांगितले.
हेही पहा : रजनीकांतच्या लाल सलामचा ट्रेलर प्रदर्शित