Theft : नगर तालुका : नेवासा परिसरात मंदिर चोरी (Theft) व घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी (Accused) जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाला यश आले आहे. जेरबंद आरोपींकडून ५७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आकाश कचरु जगधने व विशाल अरुण बर्डे (दोघे रा.गंगानगर, ता. नेवासा) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा : सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवलेल्या गोष्टी, राहुल नार्वेकरांनी ठरवल्या वैध
घरफोडीचा गुन्हा (Theft)
सुभाष चव्हाण यांनी नेवासा पोलीस ठाण्यात १ जानेवारीला फिर्याद दिली होती, की अनोळखी व्यक्तींनी नेवासा खुर्द येथील औदुंबर चौकातील दुर्गादेवी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून ११ हजार रुपये किंमतीची दानपेटी व दान पेटीतील रोख रक्कम चोरुन नेली होती. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : मराठा आरक्षणावर अजय महाराज बारस्करांनी सांगितला तोडगा
मुद्देमाल हस्तगत (Theft)
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यांना माहिती मिळाली की, आकाश जगधने याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला आहे. तो ज्ञानेश्वर कॉलनी मागे काटवनात बसलेला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने आकाश जगधने व विशाल बर्डे या दोघांना ताब्यात घेतले तर त्यांचे साथीदार अमर बर्डे व सौरभ (दोघे रा. गंगानगर, ता. नेवासा) हे पसार आहेत. जेरबंद आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख व विविध कंपनीचे चार मोबाईल फोन असा ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आकाश जगधने हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरुध्द दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, गंभीर दुखापत असे गंभीर स्वरुपाचे १९ गुन्हे दाखल आहेत. ताब्यातील दोन्ही आरोपींना मुद्देमालासह नेवासा पोलीस ठाण्यात हजर केले असुन पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहेत.